dream11 founder tells Indian techies to come back home offers jobs to employees fired by twitter meta spotify more  
देश

'घरी परत या'; ड्रिम 11च्या CEOची अमेरिकेत नोकरी गमावलेल्या भारतीयांना ऑफर

सकाळ डिजिटल टीम

जगभरातील, विशेषत: सिलिकॉन व्हॅलीमधील हजारो कर्मचार्‍यांना नोकर कपातीचा फटका बसत असताना, ड्रीम 11 चे सीईओ आणि सह-संस्थापक हर्ष जैन यांनी, ज्या भारतीयांना नोकरी गेली आहे त्यांना मायदेशात परत येण्याचे आवाहन केले आहे. हे कर्मचारी मायदेशी परत येऊन भारतीय टेक कंपन्यांच्या वाढीसाठी मदत करू शकतात असे त्यांनी म्हटले आहे

जैन यांनी LinkedIn वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 2022 मध्ये यूएस मधील टेक सेक्टरमधील लेऑफनंतर कृपया भारतीयांना घरी परत येण्याची आठवण करून देण्यात मदत करा (विशेषतः ज्यांना व्हिसासाठी अडचणी य येत आहेत). भारतात परतल्यानंतर त्यांनी पुढील दशकातील संभाव्य हायपर ग्रोथ लक्षात घेऊन भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांना मदत करावी असेही ते म्हणाले आहेत.

हर्ष जैन यांनी नोकरी गमवलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना ऑफर देखील दिली आहे. ते म्हणाले की, ड्रीम स्पोर्ट्स नेहमीच गुणवंत विशेषतः डिझाईन, पॉडक्ट आणि तंत्रझान क्षेत्रात नेतृत्वाचा अनुभव असणाऱ्यांच्या शोधात असते.

क्रंचबेस (Crunchbase) अंदाज आहे की, आतापर्यंत 2022 मध्ये अमेरिकन कंपन्यांनी 52,000 हून अधिक टेक्नोलॉजी एक्सपर्ट्सना नोकरीहून काढून टाकले आहे. अनेक बड्या कंपन्या Twitter, Stripe, Salesforce, Lyft, Spotify, Peloton, Netflix, Robinhood, Instacart, Udacity, Booking.com, Zillow, Loom, Beyond Meat आणि इतर यांनी मोठ्या कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. त्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.

अनेकांना व्हिसाच्या मुदतवाढीमध्ये अडचणी

नोकरी गेल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या ज्या लोकांकडे H1B व्हिसा आहे त्यांना यानंतर अनेक भारतीय लोक आहेत ज्यांना फटका बसला आहे, हा व्हिसा कामाच्या आधारावर उपलब्ध आहे. कोणाकडे काम नसेल तर त्याला घरी परतावे लागते.

दरम्यान घटती कमाई, कमी जाहिरातदार आणि निधीची कमतरता यामुळे टेक कंपन्यांनी खर्चात कपात करण्याच्या उपाययोजना केल्या आणि हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. नुकतेच टेक जायंट मेटाने देखील 11,00 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले. इलॉन मस्क यांनी ट्विटरचे अधिग्रहण केल्यानंतर, कंपनीचे अर्धे कर्मचारी घरी पाठवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील महापूर, अतिवृष्टीने बाधितांसाठी ७७२ कोटी, आजपासून पैसे खात्यात जमा होणार..

IND vs AUS 1st ODI Live: रोहित शर्माचा भारी विक्रम, विराटलाही संधी; भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूचे पदार्पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

Latest Marathi News Live Update : कर्मभूमी एक्सप्रेसमधून पडून दोघांचा मृत्यू, नाशिक रोडजवळ घडली घटना

Konkan Railway : कोकण रेल्वेतर्फे प्रवाशांना दिवाळी भेट, लांब पल्ल्याच्या रेल्वे थांबणार

IND vs AUS 1st ODI : रोहित शर्मा-विराट कोहली यांच्या भवितव्याची नवी पहाट; वन डे मालिका स्वतःला सिद्ध करणारी

SCROLL FOR NEXT