देश

भाजप नेत्या म्हणतात, 'ब्रश वापरू नका तर काडीने दात घासा'

पीटीआय

नवी दिल्ली : दैनंदिन जीवनातील प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर घटविण्यासाठी भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी काही अफलातून उपाय सूचविले आहेत. रोजच्या आयुष्यामध्ये आपण सर्वप्रथम ओंजळीने पाणी प्यावे आणि दात घासण्यासाठी प्लॅस्टिकच्या ब्रशऐवजी कडूनिंबाच्या काड्यांचा वापर करावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित चर्चा सत्रामध्ये मीनाक्षी लेखी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, स्वदेशी नसलेल्या वस्तूंच्या वापराचे अनुकरण करून भारताने मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आणि स्रोतांचा अपव्यय केला आहे, पाणी पिण्यासाठी आपल्याला कशाला ग्लास आणि बाटल्या हव्यात? आम्ही शाळेत होतो तेव्हा ओंजळीनेच पाणी प्यायचो. अशा प्रकारे पाणी पिणे हा अधिक स्वच्छतापूर्ण मार्ग असून या प्रक्रियेमध्ये तुमचे हात धुतले जातात आणि ग्लास धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचीही बचत होते.'' 

तसेच पूर्वी भाज्या खरेदी करण्यासाठी आम्ही बांबूपासून तयार करण्यात आलेल्या करंड्यांचा वापर करत असू. यामध्ये कोठेही प्लॅस्टिक नव्हते. कडूनिंबाच्या काडीने दात घासण्याची प्रथाही आम्ही सोडून दिली. आता सगळे दात घासण्याचे प्लॅस्टिकचे ब्रशनंतर कचराकुंडीतच जातात, असेही त्यांनी नमूद केले. जुन्या कपड्यांपासून पर्यावरणपूरक पिशव्या आणि सॅनिटरी पॅड्‌स तयार केले जावेत, असेही त्या म्हणाल्या.

देशात प्लॅस्टिकबंदीची घोषणा 

प्लॅस्टिकमुक्तीचा ध्यास घेतलेल्या केंद्र सरकारने 2022 पर्यंत प्लॅस्टिकला देशातून हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दोन आक्‍टोबर रोजी जयंती असून याच दिवशी केंद्र सरकार प्लॅस्टिकच्या काही विशिष्ट वस्तूंवर बंदी घालण्याची शक्‍यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात प्लॅस्टिकमुक्तीचा पुनरूच्चार केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT