Indian Coast Guard Gujarat ATS esakal
देश

ATS-ICG ची समुद्रात मोठी कारवाई; पाकिस्तानी बोटीतून 350 कोटींचं ड्रग्ज जप्त, 6 जणांना अटक

खराब हवामानानंतरही गुजरात एटीएससह आयसीजीनं हे मिशन पूर्ण केल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

खराब हवामानानंतरही गुजरात एटीएससह आयसीजीनं हे मिशन पूर्ण केल्याचं सांगितलं जात आहे.

नवी दिल्ली : ICG म्हणजेच, भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि गुजरात ATS यांच्या संयुक्त कारवाईला ड्रग्जच्या (Drugs) विरोधात मोठं यश मिळालंय. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकानं (ATS) संयुक्त कारवाईत शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ 50 किलो हेरॉईन ड्रग्ज घेऊन जाणारी पाकिस्तानी (Pakistan) बोट पकडलीय.

या हेरॉईनची अंदाजे किंमत सुमारे 350 कोटी रुपये आहे. एवढंच नाही, तर ICG आणि गुजरात ATS नं बोटीवरील 6 जणांना अटकही केलीय. पुढील तपासासाठी ही बोट जखाऊ बंदरात आणण्यात येत आहे. खराब हवामानानंतरही गुजरात एटीएससह आयसीजीनं हे मिशन पूर्ण केल्याचं सांगितलं जात आहे. ही बोट आणि ड्रग्जशी संबंधित अधिक माहितीसाठी एजन्सीनं तपास सुरू केला आहे.

गेल्या एका वर्षात ICG ची ATS सोबतची ही सहावी कारवाई आहे. तर, ICG नं ड्रग्जनं भरलेली बोट पकडण्याची एका महिन्यापेक्षा कमी कालावधीतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानी बोटीतून सुमारे 200 कोटी रुपयांचं 40 किलो हेरॉईन एफएम पकडण्यात आलं होतं. एवढंच नाही, तर यादरम्यान 6 जणांना अटक करण्यात आली, जे पाकिस्तानी असल्याचं सांगण्यात आलं. कोचीमध्ये यापूर्वी NCB आणि ICG नं मिळून एक पाकिस्तानी बोट पकडली होती, त्यामध्ये करोडोंचं ड्रग्ज सापडलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT