Drugs Chennai Airport esakal
देश

चेन्नई विमानतळावरून 100 कोटींचं हेरॉईन, कोकेन जप्त; सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई

चेन्नई विमानतळावर सीमा शुल्क विभागाला मोठं यश मिळालंय.

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई विमानतळावर सीमा शुल्क विभागाला मोठं यश मिळालंय.

चेन्नई विमानतळावर (Chennai Airport) सीमा शुल्क विभागाला (Customs Department) मोठं यश मिळालंय. इथिओपियन एअरलाइन्सनं (Ethiopian Airlines) अदिस अबाबाहून आलेल्या प्रवाशाकडून 9.590 किलो वजनाचे हेरॉईन (Drugs) आणि कोकेन जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतंय.

एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) अधिकारी अनिल कुमार यांच्या गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. चेन्नई एअर कस्टम्सनं (Chennai Air Customs) जारी केलेल्या निवेदनानुसार, इक्बाल बी. उरंदादी या भारतीय प्रवाशाला 11 ऑगस्ट रोजी इथिओपियन एअरलाइन्सनं विमानतळावर रोखलं. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडून 9.590 किलो वजनाचे हेरॉईन आणि कोकेन जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे.

निवेदनानुसार, प्रवाशाची आणि त्याच्या बॅगची तपासणी केली असता, त्याच्याकडे कोकेन आणि हेरॉइन सापडले. प्रवाशानं बॅग आणि शूजमध्ये लपवले होते. त्याच्याकडून नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा 1985 अंतर्गत जप्त करण्यात आले असून प्रवाशाला अटक करण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT