drunk man shouts at snake bites it into pieces at karnataka 
देश

दारूड्याने सापाला धमकावले अन् तोडले लचके...

वृत्तसंस्था

कोलार (कर्नाटक): साप रस्ता ओलांडून जात असताना दारूड्याने त्याला पकडले आणि त्याचे लचके तोडले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एक दारुडा दुचाकीवरून चालला होता. यावेळी रस्त्यावरून साप चालला होता. दारूड्याने सापाला पकडले आणि धमकावयाला सुरवात केली. दारूडा म्हणाला, माझा रस्ता आडवायची तुझी हिंम्मत कशी झाली? आणि सापाला पकडले आणि लचके तोडले.' यावेळी उपस्थितांनी मोबाईलमध्ये कैद करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. कुमार असे दारुड्याचे नाव आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे. पण, दारूड्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

दरम्यान, राज्यात दारू विक्री सुरू झाली असून, अनेकजण तासनतास रांगेत उभे राहून दारू मिळवत आहेत. राज्यात एका दारुड्याने तर 52 हजार रुपयांची दारू खरेदी केली. एका घटनेत दोघांची हत्या झाली. दुसरीकडे एक दारुडा गटारात पडला. डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कर्नाटकमध्ये सोमवारी 45 कोटी रुपयांची दारूची विक्री झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT