कोरोनामुळे पंजाबमध्ये शाळा-कॉलेज बंद! अनेक निर्बंध लागू
कोरोनामुळे पंजाबमध्ये शाळा-कॉलेज बंद! अनेक निर्बंध लागू esakal
देश

दहशत कोरोनाची... पंजाबमध्ये शाळा-कॉलेज बंद! अनेक निर्बंध लागू

सकाळ वृत्तसेवा

पंजाब सरकारनेही कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांना तोंड देण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत.

पंजाब सरकारनेही (Punjab Government) कोरोनाच्या (Covid-19) वाढत्या प्रकरणांना तोंड देण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. 4 जानेवारीपासून राज्यातील शाळा (Schools), महाविद्यालये (Colleges), विद्यापीठे (Universities) आणि कोचिंग सेंटर्स (Coaching Centers) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय 4 जानेवारीपासून रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी (Curfew) लागू असेल. राज्य सरकारचा हा आदेश 15 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे. मात्र, पंजाबमध्ये केवळ महापालिका क्षेत्रातच रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. (Due to Corona closed schools and colleges in Punjab and imposed a number of restrictions)

पंजाब सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, बार, सिनेमागृह, हॉल, रेस्टॉरंट आणि स्पा यांना 50 टक्के क्षमतेचे आदेश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण होणे आवश्‍यक आहे. एवढेच नाही तर 15 जानेवारीपर्यंत राज्यातील जिम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी आणि सरकारी कार्यालयात फक्त तेच कर्मचारी उपस्थित राहतील, ज्यांना कोरोनाच्या दोन्ही लसी (Covid Vaccine) घेतल्या आहेत.

राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात सर्व जिल्हे आणि शहरांमध्ये सकाळी 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागू असेल, असे म्हटले आहे. सरकारने सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, परंतु वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांना या बंदीतून बाहेर ठेवण्यात आले आहे. याशिवाय इतर शैक्षणिक संस्थांनाही ऑनलाइन शिक्षण (Online Education) सुरू ठेवण्यास सांगितले आहे. शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त क्रीडा संस्थांसह स्टेडियम (Stedium) आणि जलतरण तलाव (Swimming Tank) देखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, ज्या क्रीडा संस्थांमध्ये खेळाडू राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रशिक्षण घेत आहेत, अशा क्रीडा संस्था सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT