seriously injured youth accident Rajgad staff of the Archeology Department and local youth  sakal
देश

Unnao Accident : भरधाव डंपरचे भर रस्त्यात तांडव! पादचाऱ्यांना चिरडलं; माय-लेकीसह ६ जण ठार

सकाळ डिजिटल टीम

Unnao Accident : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील लखनऊ-कानपूर महामार्गावरील आझाद मार्ग क्रॉसिंगवर एका अनियंत्रित डंपरने अनेक वाहनांना धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या डंपरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना देखील चिरडले. या अपघातात अर्धा डझनहून अधिक लोक जखमी झाले. या भीषण अपघातात आई आणि मुलीसह सहा जणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अचलगंज पोलिस स्टेशन हद्दीतील आझाद मार्ग चौकात एका अनियंत्रित डंपरने कार आणि दुचाकीला धडक दिली आणि पादचाऱ्यांना चिरडले. याचबरोबर डंपर चारचाकी वाहनाला ओढत खाईत घुसला.

या अपघातात कारमध्ये असलेले बाप-लेक आणि जावई ठार झाले आहेत. अपघातानंतर ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला. दगडफेक करून रोडवेजच्या बसची तोडफोड देखील आली. त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या हवालदारालाही लोकांनी मारहाण केली. पोलीस अधिकाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन घटनास्थळी पोहोचून नागरिकांना रस्त्यावरून बाजूला केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur Accident: बदलापुरात भीषण अपघात! ट्रकचे नियंत्रण सुटले, अनेक गाड्यांना धडक; एकाचा मृत्यू, ७ जण जखमी

Pali News : सरसगड किल्ल्यावरून पडून तरुण गंभीर जखमी; डोक्याला इजा, खांदा फॅक्चर

दररोज एकजण येतो आणि काहीही बरळून जातो... पांढरा केस जपून ठेवण्यावरून शर्मिष्ठा राऊत ट्रोल; नेटकरी म्हणतात, 'डोक्यात फरक ...'

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT