duplicate yogi adityanath and akhilesh yadavs plane photo goes viral 
देश

Loksabha 2019 : 'डुप्लिकेट' योगी आदित्यनाथ झाले व्हायरल...

वृत्तसंस्था

लखनौः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अखिलेश यादव यांनी डुप्लिकेट योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले आहे.

अखिलेश यादव हे प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करत होते. परंतु, दोघांचे एकत्रित छायाचित्र पाहिल्यानंतर चर्चेला उधान आले. मात्र, खरे योगी आदित्यनाथ नसून त्यांचे डुप्लिकेट असल्याची माहिती समोर आल्यानंतर छायाचित्रावर नेटिझन्स व्यक्त होऊ लागले. अखिलेश यादव यांनी छायाचित्र ट्विट करताना म्हटले आहे की, 'आम्ही मुख्यमंत्री निवासस्थान सोडताच त्यांनी ते गंगेच्या पाण्याने धुतले. तेव्हाच आम्ही ठरवले होते, त्यांना पुरी खायला घालू.' अखिलेश यांनी छायाचित्र ट्विट केल्यानंतर चर्चेला उधाण आले होते.

योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे दिसणाऱ्या व अखिलेश यांच्यासोबत असणाऱ्या त्या व्यक्तीचे नाव सुरेश ठाकूर आहे. लखनौच्या केंट भागात ते राहतात. बौद्ध धर्माचे ते अनुयायी आहेत. ठाकूर योगींप्रमाणेच भगवे वस्त्र परिधान करतात, कानात बाळी घालतात. त्यांची वेशभूषा पूर्णपणे आदित्यनाथांसारखी आहे.

ठाकूर म्हणाले, 'माझा चेहरा योगी आदित्यनाथांसारखा दिसतो, त्याला मी काय करणार?, असा प्रश्न ठाकूर यांनी उपस्थित केला. 'मला पाहून लोकांना आनंद वाटतो, हे पाहून छान वाटते. मी कायम अशाच प्रकारची वस्त्रं परिधान करतो. भगव्या रंगाला लोकांनी हिंसेचे प्रतीक केले आहे. मात्र, मी अहिंसेचा पुरस्कार करतो. कारण मी बौद्ध धर्माचा अनुयायी आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: काय सांगता! सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या; मुंबई–पुण्यात काय दर? खरेदीला जाण्यापूर्वी नक्की वाचा…

Pune Road Development : छोटा पूल दुर्लक्षित, ६ हजार कोटींचा उन्नत महामार्ग 'कागदावरच'; मंजुरी मिळेपर्यंत जीव धोक्यात!

Latest Marathi Live News Update: संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त भांडुपमध्ये शुभेच्छा बॅनर झळकले

India Archery: अठरा वर्षांनंतर भारताचा सुवर्णभेद; बलाढ्य कोरियावर मात, यशदीप, अतानू, राहुलचा सांघिक विभागात ठसा

Farmer: मराठवाड्यात ८९९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; दहा महिन्यांत, बीड जिल्ह्यात सर्वाधिक २०० शेतकऱ्यांनी संपवले जीवन

SCROLL FOR NEXT