Rope way_MP News
Rope way_MP News 
देश

रोप वे सुरु असताना अचानक गेली वीज अन्...; भाविकांनी सांगितला थरारक अनुभव

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : डोंगराळ भागातील पर्यटनस्थळी आणि तीर्थस्थळी पर्यटकांसाठी रोप वे ची सोय केलेली आपण पाहिली असलेच. या रोपवे तून प्रवास करण्याचा थरारक अनुभवही अनेकांनी घेतला असेल. पण समजा रोप वे सुरु असतानाच अचानक वीज गेली आणि तुम्ही हवेत उंचावर अडकून पडलात तर...? तुमची अवस्था काय असेल? नेमकी अशीच परिस्थिती मध्य प्रदेशातील सतना इथल्या मेहर या तीर्थस्थळी घडली. रोप वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळं अनेक भाविकांना आपला जीव धोक्यात घालावा लागला त्यांना चक्क काही काळ हवेतच लटकून रहावं लागलं. (During rope way running suddenly power cut off thrilling experience of devotees in MP)

मेहर इथं सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी प्रचंड वेगानं वारे वाहत होते. त्यामुळं अचानक वीज गायब झाली आणि नेमके त्याचवेळी अनेक रोप वे आकाशात झेपावले होते. त्यामुळं सुमारे अर्धा तास भाविकांना रोप वे च्या ट्रॉलीमध्ये अडकून पडावं लागलं. यामध्ये सुमारे ८० लोक होते. पण सुदैवानं या ठिकाणी कोणतीह मोठी घटना घडली नाही. यावेळी २८ ट्रॉलिंमध्ये ८० भाविक अडकून पडले होते.

वीज पुरवठा पूर्ववत केल्यानंतर भाविकांना ट्रॉलीजमधून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलं. ट्रॉलिमधून उतरणाऱ्या भाविकांनी सांगितलं की, रोप वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळं हा प्रकार घडला. एकतर हवामान खराब असताना रोप वे बंद ठेवायला हवा होता. एका महिलेनं सांगितलं की, आता आमचा यामध्ये जीव जाणार. या ठिकाणी एकूण ३२ ट्रॉलीज असून यांपैकी २-२ ट्रॉली कायम स्टेशनवर असतात. तर इतर सर्व ट्रॉलीज भाविकांची डोंगराच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत ने-आण करत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

SCROLL FOR NEXT