Durga Visarjan esakal
देश

VIDEO : दुर्गा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना; पुरात 8 जण बुडाले, 40 लोक बेपत्ता

दुर्गा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडलीय.

सकाळ डिजिटल टीम

दुर्गा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडलीय.

जलपायगुडी : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) दुर्गा विसर्जनादरम्यान (Durga Visarjan) मोठी दुर्घटना घडलीय. जलपायगुडीतील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळं 8 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

याशिवाय, अनेक जण अजूनही नदीत अडकले आहेत. एनडीआरएफची टीम रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होतं. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. 30-40 लोक अजूनही बेपत्ता असल्याचं समजतं. दुर्गा विसर्जनाच्यावेळी माल नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळं जोरदार प्रवाहात अनेक लोक वाहून गेले.

या घटनेची माहिती मिळताच एकच घबराट झाली. पाण्यात वाहून गेलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरु केला. अपघातानंतर लगेचच जिल्हा प्रशासनानं विसर्जनाचा कार्यक्रम थांबवला. त्यानंतर लोकांना वाचवण्यास सुरुवात केली. या अपघातात 8 जणांचे मृतदेह सापडले असून 10 जखमींना वाचवण्यात यश आलं आहे. अजूनही बचाव कार्य सुरुच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna: कृषी विभागाकडून घेतलं बियाणं, उगवलंच नाही; १५ शेतकऱ्यांची १० हेक्टरवरील पेरणी गेली वाया, मोठं नुकसान

Viral Video: पुराच्या पाण्यात अचानक वाहून आले ९०० साप, किंग कोब्राचा एकाला दंश, परिसरात भीतीचे वातावरण; लोक घरात बसले लपून, व्हिडिओ व्हायरल

Marathi News Live Updates: मुळशीतील गोशाळेवर दरड कोसळली; आठ ते दहा जनावरांचा मृत्यू

Ahilyanagar News: अन्न-औषध विभागाचा मोठा दणका! नगरमधील 'संगम' आणि 'सत्कार' हॉटेलचे परवाने निलंबित, अस्वच्छ किचनचा फटका..

IND vs ENG:जोफ्रा आर्चरने भारतीय संघाला दाखवला आरसा; आयपीएल अन् इंग्लंडमध्ये खेळण्याचा फरक केला स्पष्ट

SCROLL FOR NEXT