Earthquake Nepal and North India 6 people died 5 injured sakal
देश

Earthquake : नेपाळ आणि उत्तर भारतत भूकंप; ६ जणांचा मृत्यू; ५ जखमी

सहा जणांचा मृत्यू; नागरिक घराबाहेर पळाले

सकाळ वृत्तसेवा

काठमांडू/ नवी दिल्ली/देहरादून : नेपाळमध्ये मंगळवारी मध्यरात्री भूकंपाचे तीव्र धक्के बसले. रिश्‍टर स्केलवर त्याची तीव्रता ६.६ ते ६.३ एवढी नोंदली गेली. या भूकंपामुळे सहा जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. तसेच भारतातही राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांना भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळच्या राष्ट्रीय भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्‍चिम नेपाळमध्ये मध्यरात्रीनंतर १. वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. त्याचे केंद्र भारताच्या पिठोरागड येथून ९० किलोमीटर अंतरावर होते. या भूकंपामुळे अनेक घरांची पडझड झाली.

गाढ झोपेत असणारे नागरिक अचानक धक्के जाणवू लागल्याने घराबाहेर पळाले. त्याचवेळी उत्तराखंड-नेपाळ भागात पहाटे ३.१५ वाजता आणि ६.२७ वाजता भूकंपाचे धक्के बसले. त्याची तीव्रता रिश्‍टर स्केलवर अनुक्रमे ३.६ आणि ४.३ एवढी नोंदली गेली. नेपाळच्या भूगर्भशास्त्र विभागाने डोटी जिल्ह्यात २.१२ वाजता भूकंपाचा मोठा धक्का बसल्याचे सांगितले. त्याची तीव्रता रिश्‍टर स्केलवर ६.६ एवढी होती. तत्पूर्वी पश्‍चिम नेपाळमध्ये मंगळवारी रात्री ९.०७ वाजता आणि ९.५६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले होते. कालच्या भूकंपामुळे झालेल्या विविध दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला.

राजधानी, गाझियाबादला धक्के

भूकंपामुळे पश्‍चिम नेपाळ हादरलेले असताना इकडे भारतात नवी दिल्लीसह गाझियाबाद, गुरुग्राम तसेच लखनौत भूकंपाचे धक्के जाणवले. बिहारच्या सीतामढीच्या नेपाळलगत मेजरगंज, सोनबरसा, सुरसंड, परिहार, कन्हौली, बेलासह अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. उत्तर प्रदेशात काल रात्री साडे आठ वाजता लखनौसह अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Latest Marathi News Live Update : फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक आज काही वेळासाठी बंद करण्यात येणार

Panchang 3 October 2025: आजच्या दिवशी अर्गला स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT