Election Commission of India 2022 Team eSakal
देश

Assembly Elections 2022 : प्रचार कार्यक्रमांना निवडणूक आयोगाचा दिलासा

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.

सुधीर काकडे

निवडणूक आयोगाने (Elections Commission of India) रविवारी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2022) प्रचारासाठी रोड शो, पदयात्रा, सायकल आणि वाहन रॅलींवर घातलेली बंदी वाढवली आहे. मात्र राजकीय सभांसाठीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. खुल्या मैदानात होणाऱ्या सभा, बंद इमारतींमधील सभा आणि रॅलींबाबत निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. बंद सभागृहात 50 टक्के क्षमतेने आणि खुल्या मैदानात 30 टक्के क्षमतेने सभा घेण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

याशिवाय घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी 20 जणांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आलेली आहे. तसंच रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत प्रचारावर बंदी असणार आहे. देशातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून, अनेक ठिकाणी नेत्यांना कोरोना नियमांचा विसर पडल्याचं दिसतंय.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी सर्व राज्यांत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याने निवडणूक आयोगाने नोटीस देखील बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT