EC informs SC-1.66 crore names removed from electoral roll-Information of the Election Commission in the Supreme Court 
देश

EC informs SC: मतदार यादीतून तब्बल 1.66 कोटी नावं काढली; निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

EC informs SC: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) या वर्षाच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या वार्षिक पुनरिक्षणात मतदार यादीतून 1.66 कोटींहून अधिक नावे काढून टाकली आहेत, अशी माहिती निवडणूक निरीक्षकाने सर्वोच्च न्यायालयाला दिली.

Sandip Kapde

EC informs SC: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) या वर्षाच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या वार्षिक पुनरिक्षणात मतदार यादीतून 1.66 कोटींहून अधिक नावे काढून टाकली आहेत, अशी माहिती निवडणूक निरीक्षकाने सर्वोच्च न्यायालयाला दिली. तर 2.68 कोटीहून अधिक नवीन मतादार जोडले गेले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत एकूण पात्र मतदारांची संख्या जवळपास 97 कोटी आहे.

आसाम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा ही सहा राज्ये वगळता संपूर्ण देशात या यादीत सुधारणा करण्यात आली. मतदार यादीतील डुप्लिकेट नावे शोधून काढण्याची मागणी करणाऱ्या संविधान वाचवा ट्रस्टने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर (पीआयएल) सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयात 2 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने शपथपत्राद्वारे ही आकडेवारी शेअर केली होती.

भारताचे सरन्यायाधीश (CJI) धनंजय वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सोमवारी आयोगाला मृत मतदार, कायमचे स्थलांतरित झालेले आणि डुप्लिकेशनमुळे हटवलेले मतदार दर्शवणारा आकडा सादर करण्यास सांगितले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी ठेवली. (Latest Marathi News)

निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात वकील अमित शर्मा म्हणाले, “1 जानेवारी 2024 च्या संदर्भात मतदार यादीचे विशेष सारांश पुनरिक्षण (SSR), पात्रता तारीख 8 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्ण होत आहे. एसएसआरच्या या कालावधीत आजपर्यंत एकूण 2,68,86,109 नवीन मतदारांची मतदार यादीत नावनोंदणी करण्यात आली आहे आणि मृत, डुप्लिकेट आणि कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या कारणास्तव 1,66,61,413 विद्यमान नोंदी हटवण्यात आल्या आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT