Liquor Policy Case  sakal
देश

Liquor Policy Case : ‘आप’चे दुर्गेश पाठक यांची ईडी चौकशी

‘ईडी’ने दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात आम आदमी पक्षाच्या आणखी एक आमदार दुर्गेश पाठक यांना आज समन्स पाठवून चौकशी केली. यासोबतच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांचीही ईडीने चौकशी केली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘ईडी’ने दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात आम आदमी पक्षाच्या आणखी एक आमदार दुर्गेश पाठक यांना आज समन्स पाठवून चौकशी केली. यासोबतच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांचीही ईडीने चौकशी केली.

मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता तिहार कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.

तर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही अद्याप जामीन मिळाला नाही. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत प्रचारमोहिमेत पक्षाला अडचण येत असताना आता आमदार दुर्गेश पाठक यांचीही ईडीने चौकशी आरंभल्याने पक्षाला धक्का बसला आहे.

आमदार पाठक यांच्याप्रमाणेच ईडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांचीही चौकशी केली. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींतर्गत विभव कुमार यांचा जबाब नोंदविला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री आतिशी यांना ईडीच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करताना स्वतःसह, मंत्री सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक यांच्या अटकेची शक्यता वर्तविली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT