sanjay singh Sakal
देश

ED Raid on Sanjay Singh : 'आप'चे खासदार संजय सिंह यांच्या घरी ईडीचे छापे! शोध मोहीम सुरूच

याआधी मे महिन्यातही ईडीने संजय सिंह यांच्या घरावर छापे टाकण्यात आले होते

रोहित कणसे

ED Raid on AAP MP Sanjay Singh : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या दिल्लीच्या घरी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) टीम बुधवारी (4 ऑक्टोबर) छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. ईडीचे पथक सध्या त्यांच्या निवासस्थानी शोध घेत आहे. याआधी मे महिन्यातही ईडीने संजय सिंह यांच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या साथीदारांच्या घरांवर आणि कार्यालयांमध्ये देखील शोधमोहीम राबवण्यात आली.

संजय सिंग यांच्याकडून सातत्याने ईडी आणि सीबीआयवर आरोप केले जातात. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते सांगत राहतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे की, दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत संजय सिंह यांच्या बाजूने कोणत्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य आलेले नाही किंवा आम आदमी पक्षाने यावर काहीही माहिती दिलेली नाहीये.

माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सध्या दिल्ली दारू धोरण प्रकरणात तुरुंगात आहेत. आम आदमी पक्षाने यापूर्वीच कोणताही घोटाळा केला नसल्याचे सांगितले आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याच्या सुरू असलेल्या तपासात आप नेत्यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. पक्षाचा दावा आहे की आजपर्यंत तपास यंत्रणेला कोणत्याही प्रकारचे पुरावे मिळालेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT