Punjab CM Charanjit Singh Chhanni google
देश

मुख्यमंत्री चन्नी यांच्या कुटुंबीयांवर ईडीचे छापे, राजकीय वातावरण तापलं

पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी (Punjab CM Charanjitsing Channi) यांच्या नातेवाईकांवर ईडीने छापे (ED Raid) टाकले आहेत.

ओमकार वाबळे

देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर राजकीय धुळवडीला सुरुवातही झाली. पंजाबमध्ये 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडत आहे. मात्र, त्याआधी घडणाऱ्या घटनांनी वातावरण गरम झालंय. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी (Punjab CM Charanjitsing Channi) यांच्या नातेवाईकांवर ईडीने छापे (ED Raid) टाकले आहेत.

सक्तवसुली संचलनालयाने आज पंजाबमध्ये काही ठिकाणी छापेमारी केली. छापे टाकलेल्या व्यक्ती मुख्यमंत्र्यांशी संबंधित असल्याच समोर आलंय. चन्नी यांच्या कुटुंबीयांवरच ईडीने धाड मारली आहे. वाळूमाफिया भूपिंदरसिंग हनी यांच्या काही मालमत्तांची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर हा वाद उफाळून आला आहे.

आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही संबंधित घटना अयोग्य असल्याचं म्हटलं.

पंजाबमध्ये एकूण 10 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. छापे टाकण्यात आलेल्या व्यक्ती चन्नींचे निकटवर्तीय आहेत. दरम्यान पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील ईडीच्या या धाडींमुळे पंजाबचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

नातेवाईकांच्या मालमत्तांवर छापा टाकला जात आहे. ते मला टार्गेट करत आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री चन्नी यांनी केला. हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. आम्ही यासाठी लढण्यास तयार आहोत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही असेच घडलं, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

Latest Marathi News Updates: सध्या तरी पाकिस्तानसोबत क्रिकेट आणि व्यापार नको : हरभजन सिंह

SCROLL FOR NEXT