Farooq Abdullah  Team eSakal
देश

JKCA : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांना ईडीचं समन्स!

काय प्रकरण आहे नक्की जाणून घ्या?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनं जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांना समन्स पाठवलं आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील (JKCA) कथीत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. समन्सनुसार ३१ मे पर्यंत अब्दुल्ला यांना ईडीसमोर हजर रहावं लागणार आहे. यापूर्वीच्या समन्सवेळी ते हजर राहू शकले नव्हते म्हणून ईडीनं त्यांना पुन्हा समन्स बाजवलं आहे. (ED summons Farooq Abdullah in JKCA money laundering case)

ईडीनं अब्दुल्ला यांना समन्स बजावलं असल्याचं नॅशनल कॉन्फरन्सनं शुक्रवारी ट्विटद्वारे स्पष्ट केलं आहे. ईडीचं समन्स येणं हे काही आता नवं राहिलेलं नाही, भारतील सर्व विरोधीपक्षांसाठी हे सामान्य झालं आहे. ईडीच्या चौकशीला आम्ही सहकार्य करणार आहोत तसेच आपलं निर्दोषत्व सिद्ध करु असं पक्षानं ट्विटद्वारे म्हटलं आहे.

जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी यावर्षी मार्च महिन्यात ईडीकडून फारुख अब्दुल्ला यांची ७.२५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. बीसीसीआयनं जेकेसीएला दिलेल्या अनुदानाबाबत हा घोटाळा आहे. सन २००२ ते २०११ मध्ये ४३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं सांगितलं जात आहे. पण हा घोटाळा ५० कोटी रुपयांचा असल्याचा दावा आता ईडीनं केला आहे. हा घोटाळा बीसीसीआयनं जेकेसीएला दिलेल्या ११२ कोटी रुपयांच्या अनुदानातील भाग होता.

ईडीनं दावा केला आहे की, JKCA चं सध्या बँक अकाऊंट असताना सहा नवे बँक अकाऊंट उघडण्यात आले आहेत. जेकेसीएच्या पार्किंगमधून मिळणाऱ्या पैशासाठी हे आकाऊंट उघडण्यात आलं आहे. तसेच पार्किंगचे पैसे ठेवण्यासाठी आणखी एक अकाऊंट जे जेकेसीएच्या काश्मीर विंगसाठी उघडण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT