Education 
देश

Coronavirus : अनेक देशांतील मुलांचे शिक्षण त्याच बरोबर आरोग्याला देखील मोठा फटका

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गामुळे जगाच्या अर्थगाड्याची चाके गाळात रुतली असतानाच आता याचा विपरित परिणाम सर्वच देशांतील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेवर देखील होणार आहे. यामुळे अनेक देशांतील मुलांचे शिक्षण तर थांबणारच आहे पण त्याच बरोबर त्यांच्या आरोग्याला देखील याचा मोठा फटका बसेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जागतिक बँकेच्या तज्ञांनी यासंदर्भात एक अहवाल तयार केला असून त्यातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनामुळे जग शिक्षणासंदर्भातील चौथ्या वैश्विक शाश्वत विकास ध्येयाला याआधीच मुकले असून सर्वाना मोफत आणि दर्जेदार शिक्षण हे आता केवळ स्वप्नच राहणार आहे.

कोरोनाचा जगभरातील मुलांना कमीतकमी फटका बसावा म्हणून जागतिक बँक युद्धपातळीवर प्रयत्न करत असून यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्य संस्थांची देखील मदत घेतली जात आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे याआधीच जगातील शिक्षण व्यवस्थेवर त्याचे मूलगामी परिणाम झाले आहेत, बहुतांश देशांतील शाळा सध्या बंद आहेत. भविष्यात हे संकट आणखी बिकट होणार आहे. यानंतर जेव्हा जागतिक मंदी येईल तेव्हा मात्र ही समस्या भीषण होऊ शकते, कारण शाळेत जाण्यासाठी लोकांच्या हातात पुरेसा पैसा नसेल असे जागतिक बँकेच्या शिक्षण विभागाचे संचालक जैम सावेंद्रा यांनी सांगितले.

ही काळजी घ्यावी 

  • मुलांचे आरोग्य सांभाळणे 
  • शाळा उघडण्याचे नियोजन आखावे लागणार 
  • मुलांची गळती रोखावी 
  • शैक्षणिक व्यवस्था सुधारावी

आराखड्याची गरज  
कोरोनामुळे सर्वच देशांतील शाळा बंद झाल्याने जगभरातील १५४ कोटी विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. संसर्ग संपल्यानंतर शाळा सुरु करायच्या याची मार्गदर्शक तत्त्वे संयुक्त राष्ट्राशी संबंधित संघटनांनी तयार केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

CJP Protest : आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर; शरद  पवार, अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT