देवेंद्र फडणवीस  sakal
देश

राज्य सरकारकडून कारखान्यांना कर्ज मिळू नये म्हणून प्रयत्न - देवेंद्र फडणवीस

साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र संदर्भातील मोठी बैठक

संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली : राज्य सरकारकडून भाजप संबंधित कारखान्यांना कर्ज मिळू नये म्हणून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र संदर्भातील दिल्लीत आज मोठी बैठक होत आहे. केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षते खाली बैठक होत असून, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस त्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील प्रश्न, साखर उद्योगासमोरील अडचणी आदी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. त्यापूर्वी रावसाहेब दानवे यांच्या घरी सफदरजंग लेन येथील निवासस्थानी फडणवीस, राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल यांची बैठक झाली. या दरम्यान फडणवीस यांनी, दुष्काळात अडचणीत आले, त्यांना मदत करा. भाजपच नाही, सर्व पक्षांच्या नेत्यांच्या ताब्यातील कारखान्यांना मदत करा, अशी मागणी केंद्राकडे करणार असल्याचे सांगितले. एफआरपी बाबत त्यांनी सांगितले, की एफआरपी एकरकमी हा कायदा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात आलेला आहे. असा कायदा का केला, हे त्यांनाच विचारले पाहिजे. आता तीन टप्प्यात एफआरपी द्या, असे बोलून काय उपयोग, असा टोला त्यांनी लगावला. इतर राज्यात असा कायदा नाही महाराष्ट्रात हा कायदा मोडता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT