Narendra Modi in Mumbai tomorrow to accept Lata Dinanath Mangeshkar award sakal
देश

मोदी सरकारची आठवी वर्षपूर्ती; देशभर गुंजणार हनुमान चालिसा

एवढेच नव्हे तर, मंदिरांमध्ये पूजा, यज्ञ आणि हनुमाना चालिसेचे पठणही केले जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राज्यात एकीकडे हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठनावरून घमासान सुरू असताना आता, मोदी सरकारच्या आठव्या वर्षेपूर्तीनिमित्त हनुमान चालिसाचं पठन केलं जाणार आहे. भाजपकडून देशभरात हा उपक्रम राबविला जाणार आहे. एवढेच नव्हे तर, मंदिरांमध्ये पूजा, यज्ञ आणि हनुमाना चालिसेचे पठणही केले जाणार आहे. या अंतर्गत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी संध्याकाळी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि देशाची सत्ता भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारकडे गेली. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून याचे आयोजन करण्यात आले आहे. (BJP Announced Hanuman Chalisa Path On 8th Anniversary )

गेल्या महिनाभरापूर्वीच भाजपकडून या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. या दिवशी म्हणजेच 26 मे रोजी देशभरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये पूजा, यज्ञ आणि हनुमान चालिसाचे पठन केले जाणार आहे. यादरम्यान देशभरात लाभार्थी संमेलन, युवा संमेलन आणि मागासवर्गीयांसाठीचे संमेलन आयोजित केले जाणार आहे. मोदी सरकारच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक केंद्रीय मंत्री आणि नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपचे म्हणणे आहे की सरकारने देशात उज्ज्वला, जन धन, हर घर नल अशा अनेक योजना सुरू केल्याचा दावा केला आहे. सरकार आपल्या सर्व योजनांच्या मदतीने देशाला नवीन भारताच्या निर्मितीकडे घेऊन जाण्याचा दावा करत आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकार अमृत महोत्सवही साजरा करत आहे.

राहुल गांधींची टीका

तत्पूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "आठ वर्षांच्या मोठ्या चर्चेचा परिणाम म्हणून भारताकडे केवळ 8 दिवसांचा कोळसाचा साठा आहे." असल्याची बोचरी टीका केली आहे. तसेच त्यांनी दिल्ली आणि मध्य प्रदेशातील हिंसाचारग्रस्त भागात बुलडोझर वापरल्याबद्दल सरकारवर हल्ला करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "द्वेषाचे बुलडोझर" थांबवण्याचे आणि वीज प्रकल्प सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT