death e sakal
देश

लहान भावाचा मृतदेह कुशीत घेऊन सोडले प्राण

नामदेव कुंभार

कोरोना काळात उत्तर प्रदेशमधून (UP) मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. हमीरपूर जिल्ह्यात तापामुळे लहान भावाचा मृत्यू झाला होता. लहान भावाचा मृतदेह कुशीत घेऊन हुंदके देत रडत रडत मोठ्या भावानेही प्राण सोडला. दोन्ही भावाच्या मृत्यूनं गावात शोककळा पसरली. गावाबाहेर दोन्ही भावाच्या मृतदेहावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. (Elder brother cried after body of the younger brother broke down in shock in hamirpur)

हमीरपूर (hamirpur) जिल्ह्यातील खडेहीलोधन गांवातील निवृत्त शिक्षक (Teacher) रामगोपाल वर्मा यांना मागील चार दिवसांपासून ताप आणि खोकला येत होता. कुटुबियांनी उपचारासाठी त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, स्थानिक डॉक्टरांनी (Doctor) त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. येथे उपचारादरम्यान रामगोपाल वर्मा यांचं निधन झालं. अंत्य संस्कारासाठी त्यांचा मृतदेह गावात आणला गेला. लहान भावाचा मृतदेह भावून मोठ्या भावाला आश्रू अनावर झाले. मृतदेहाला कुशीत घेतल्यानंतर मोठ्या भावाच्या अश्रूचा बांध फुटला. रडता रडताच त्यांचाही मृत्यू झाला. दोन्ही भावाचा मृत्यू झाल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे.

दोन्ही भावांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही भावात लहानपणापासूनच खूप प्रेम होतं, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगोपल वर्मा चार दिवसांपासून आजारी होते. तर मोठा भाऊही गेल्या काही दिवसांपासून सतत आजारी असायचा. लहान भावाच्या मृत्यूचं दु:ख मोठ्या भावाला सहन न झालं नाही. लहान भावाचा मृतदेह कुशीत घेत मोठ्या भावानेही प्राण सोडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Latest Marathi News Live Update: गुंज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३० जणांना चावा

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

SCROLL FOR NEXT