Election Commission esakal
देश

Election: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'EVM' मशीन तपासणी सुरू; 'या' राज्यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

Election Commission: पुढील वर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका आणि या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा विचार करता केंद्रीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि पेपरट्रेल मशीन्सची पहिल्या टप्प्यातील तपासणी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ही तपासणी प्रक्रिया सर्व देशभर विविध टप्प्यांमध्ये चालणार असून त्यात केरळमधील मतदारसंघांचा देखील समावेश असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अपात्र जाहीर करण्यात आल्यानंतर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाची जागाही रिकामी झाली होती.

या सगळ्या तपासणी प्रक्रियेचे वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले असून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देखील याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.

ज्या मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून येतील ती तातडीने निर्मात्या कंपनीकडे परत केल्या जातील असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगण आणि मध्यप्रदेश या पाचही राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातली असून येथे देखील तपासणी प्रक्रिया पार पडेल. तसेच ज्या राज्यांमध्ये पोटनिवडणूक होऊ घातली आहे तिथे देखील ही तपासणी होईल.

सध्या वायनाड, पुणे, चंद्रपूर (महाराष्ट्र), गाझीपूर (उत्तरप्रदेश) आणि अंबाला (हरियाना) या लोकसभेच्या जागा रिक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

SCROLL FOR NEXT