Election Commissioner Arun Goyal Resigned Esakal
देश

Election Commissioner Arun Goyal Resigned : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी का दिला राजीनामा? पडद्यामागे काय घडतंय

Election Commissioner Arun Goyal Resigned : लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगात घडलेल्या या मोठ्या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Election Commissioner Arun Goyal Resigned : देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच निवडणूक आयुक्त अरूण गोयाल यांनी शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला. लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगात घडलेल्या या मोठ्या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अरूण गोयाल यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत असताना त्यांनी असा तडकाफडकी राजीनामा का दिला आणि तो लगेच कसा मंजूर झाला असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, काही वृतांनुसार निवडणूक आयोगाचा राजीनामा देणारे निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याशी अनेक मुद्द्यांवरून मतभेद होते. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण गोयल यांचे मुख्य निवडणूक आयुक्तांशी असलेले मतभेद हे कोणत्याही धोरणात्मक मुद्द्यावर नसून निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय बाबी, Logistics, Establishment, पत्रकार परिषदा आदी मुद्द्यांवर होते.

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी धोरणाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर लेखी असहमती व्यक्त केली नव्हती. पण, माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय आणि कामांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. अरुण गोयल हे अशा मुद्द्यांवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या निर्णयासोबत नव्हते.

त्याचबरोबर, अरुण गोयल यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील नूतनीकरणाच्या कामावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले होते आणि निवडणूक आयोगातील नूतनीकरणाच्या कामावर ते असहमत होते. निवडणूक आयोग कार्यालयाच्या परिसरात मीडिया रूम बांधण्यात आली असून अनेक नूतनीकरणाची कामे करण्यात आली आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या कामांना नव्या काळाची गरज म्हणून आणि निवडणूक आयोगाच्या रचनेत बदल म्हणून पाहिले, पण अरुण गोयल यांनी या कामांना फालतू खर्च असल्याचे म्हटलं होतं.

निवडणूक आयुक्त अरुण गोयल निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या राज्यांच्या दौऱ्यात पत्रकार परिषद घेण्याच्या बाजूने नव्हते आणि ते केवळ प्रेस स्टेटमेंट जारी करण्याच्या बाजूने होते. गोयल हे त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच पत्रकार चर्चा न करण्याच्या बाजूने होते, परंतु मुख्य निवडणूक आयुक्त पत्रकार चर्चा करण्याची वर्षानुवर्षे चाललेली परंपरा पाळत होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ही प्रथा सुरू ठेवली, जेव्हा अरुण गोयल यांच्याशिवाय अनुप चंद्र पांडे हे निवडणूक आयुक्त म्हणून उपस्थित होते.

निवडणूक राज्यांना भेट देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या टीममधील सदस्यांची संख्या कमी ठेवावी, अशी अरुण गोयल यांची इच्छा होती. अरुण गोयल यांची मर्जी लक्षात घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांनीही सदस्यांची संख्या कमी केली होती. मात्र, अलीकडच्या काळात निवडणूक दौऱ्यांमध्ये निवडणूक आयोगासोबत येणाऱ्या सदस्यांची संख्या वाढली आहे. अलीकडच्या काळात निवडणुकीच्या तयारीत काही विभागांची भूमिका वाढल्याने निवडणूक आयोगाच्या भेटीगाठीत संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आल्याचे एका हिंदी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे.

निवडणूक आयोगाचे कर्मचारी असो किंवा अधिकारी, निवडणूक आयोग अरुण गोयल यांच्या राजीनाम्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सूत्रांनी सांगितले की अरुण गोयल यांच्यातील मतभेदाचे कारण धोरणात्मक मुद्द्यावर कधीच नव्हते, परंतु कार्यशैलीच्या मुद्द्यावर नक्कीच होते. परंतु निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, मतभेदांचे कारण असे नाही की निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची अपेक्षा असेल.

अरूण गोयाल यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगातील कर्मचारी, अधिकारी सर्वजण शांत आहेत. त्यांच्या राजीनाम्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अरुण गोयल यांच्यातील मतभेदाचे कारण धोरणात्मक मुद्द्यावर कधीच नव्हते, परंतु कामाच्या संबधित मुद्द्यावर नक्कीच होते. मात्र, या मतभेदांमुळे ते निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा देतील असं कोणालाही वाटलं नव्हतं.

या सर्व चर्चा आणि शक्यतांच्या दरम्यान असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, निवडणूक आयुक्त अरूण गोयाल यांनी या मतभेदांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे की, त्यामागे आणखी काही मोठे कारण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT