नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी  Sakal
देश

भाजपासाठी निवडणुका खुल्या विद्यापीठासारख्या : मोदी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आमच्यासाठी निवडणूक हे खुलं विद्यापीठ आहे. यात स्वत:ला तपासण्याची संधी मिळते असे, मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केले आहे. निवडणुका जिंकल्यानंतर आम्ही मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. विजय डोक्यात जाऊ न देण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे म्हणत पराभवातूनही आम्ही शिकतो असे मोदी म्हणाले. विजयाची हवा डोक्यात जाऊ नये हे आम्ही लक्षात ठेवतो म्हणून जमिनीवर असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वरील विधान केले आहे. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. (Elections Are Like Open University Narendra Modi )

आम्ही समोरच्याची रणनिती काय होती, आपलं काय कमी पडलं आणि आपण आपलं म्हणणं कसं पोहोचवू शकतो यावर चिंतन करतो असे मोदी म्हणाले. भाजपचा मंत्र सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास असा असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आमचा सिद्धांत बदलला नाही. या दिवसात जगातले लोकही माझ्या भाषेचं भाषांतर करून सांगतात. जेव्हा माध्यमात समाजात काही दबाव टाकला जात असेल तर त्याची चिंता व्यक्त करायला हवी. एका संप्रदायात या जातीव्यवस्थेचं वर्णन केलं जाईल आणि दुसऱ्या ठिकाणी नाही केलं असं कसं असा प्रश्न देखील मोदी यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजप हार-पराजयातूनच निवडणुका जिंकायला शिकला आहे. आम्ही अनेक पराभव पाहिले असून डिपॉझिट जप्त होताना देखील पाहिले आहे. मी ज्यावेळी राजकारणात नव्हतो त्यावेळी जनसंघाचे निवणूक चिन्ह दीपक होते. त्यावेळी एकदा जनसंघाचे लोक मिठाईचे वाटप करताना पाहिले होते, तेव्हा निवडणुका हरल्यानंतर देखील हे लोक मिठाई का वाटत आहे, असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला होता. त्यावेळी तीन जागांवर सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होण्यापासून वाचल्याचे मला सांगण्यात आले होते, अशी आठवणदेखील मोदी यांनी यावेळी सांगितली.

परदेशातील अनेक नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या राज्यात नेलं. प्रत्येकाला सोबत नेण्याचा प्रयत्न करतो. पण दुर्दैवाने काही नेते त्यांच्या स्वार्थासाठी विविधतेला एक दुसऱ्याच्या विरोधासाठी वापरत आहेत. आम्हाला विविधतेतून एकता वाढवायची आहे. याआधी फुटीरतावाद वाढवण्याचेच प्रयत्न गेल्या पन्नास वर्षात झाल्य़ाचे मोदी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

SCROLL FOR NEXT