Narendra Modi
Narendra Modi sakal
देश

Narendra Modi : जम्मू- काश्मिरात लवकरच निवडणूक ; पंतप्रधान मोदी यांचे विधानसभेबाबत आश्‍वासन

सकाळ वृत्तसेवा

उधमपूर (जम्मू- काश्मीर) : जम्मू- काश्मीरमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार असून या प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल. गेल्या अनेक दशकांनंतर जम्मू- काश्मीरमध्ये शांततेत निवडणूक पार पडत आहे.

राज्यावरील दहशतवादाची छाया दूर झाली असून सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि दगडफेक देखील थांबली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सभेत बोलताना केले. राज्यातील जनतेचे दुःख आपण दूर केले असल्याचे सांगतानाच आम्ही रद्द करून दाखविलेले ३७० वे कलम पुन्हा आणून दाखवा असे आव्हान त्यांनी विरोधी पक्षांना दिले. केंद्रीयमंत्री जितेंद्रसिंह यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘मागील पाच दशकांपासून मी जम्मू- काश्मीरमध्ये येतो आहे. माझ्या मनात आजही एकता यात्रेची आठवण आहे. तेव्हा श्रीनगरमधील लाल चौकात १९९२ मध्ये ध्वजवंदन करण्यात आले होते. आमचे भव्य स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये वैष्णोदेवी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर मी जाहीर सभेला देखील संबोधित केले होते.

त्या सभेत मी येथील लोकांना दहशतवादापासून मुक्ती देण्याचे आश्वासन दिले होते. लोकांच्या आशीर्वादामुळेच मला त्या आश्वासनाची पूर्तता करता आली.’’ ‘‘ अमरनाथ आणि वैष्णोदेवीची यात्रा म्हटले की नेहमीच यात्रेकरूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत असे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. राज्यामध्ये चौफेर विकास होतो आहे. राज्यातील लोकांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे,’’ असेही मोदी यांनी सांगितले.

तेजस्वी, लालू यादवांवर टीका

मोदींनी याच सभेमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर देखील जोरदार टीका केली. ‘‘ नवरात्रीच्या काळामध्ये मांसाहार केल्याचा व्हिडिओ व्हायरल करून ही मंडळी नेमकी कुणाला खूष करू पाहत आहेत? ’’असा सवाल त्यांनी केला. ‘‘ सणासुदीच्या काळातच लालूप्रसाद यादव आणि राहुल गांधी यांचे मांसाहार करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. जी व्यक्ती जामिनावर बाहेर आहे, एका प्रकरणामध्ये ती आरोपी असताना देखील राहुल तिच्या घरी जाऊन मटण तयार करण्याचा आनंद लुटत होते,’’ असे मोदी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT