elephant 
देश

प्राण्यांमध्ये सर्वात संवेदनशील असलेल्या हत्तीबद्दल या 10 गोष्टी माहिती आहेत का?

सकाळ वृत्तसेवा

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला अननसातून फटाके दिल्यानं तिचा मृत्यू झाला. माणसाने गाठलेल्या या क्रूरतेच्या कळसानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हत्ती सर्वात संवेदनशील असा प्राणी समजला जातो. माणसानंतर बुद्धीमान प्राण्यांमध्येही हत्तीचे नाव घेतलं जातं. या प्राण्यांमधील एका हत्तीणीची जी गर्भवती होती तिची अशा प्रकारे हत्या हा एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. 
गेल्या हजारो वर्षांपासून देशात राजे महाराजे हत्तींना त्यांच्या सैन्यात स्थान देत आले आहेत. राजांच्या सैन्यात हत्तींची संख्या बरीच मोठी असायची. शत्रूला नामोहरम करण्यात हत्तींची भूमिका महत्वाची असायची. किल्ल्यांचे अभेद दरवाजे तोडण्यासाठी हत्तींचा वापर केला जात असे. 

  1. हत्ती 100 वर्षांहून अधिक काळ जगू शकतात. एका मिनिटात हत्ती 2 किंवा 3 वेळा श्वास घेतात आणि सोडतात. 
  2. जगात हत्ती एकमेव असा प्राणी आहे जो उडी मारू शकत नाही. हत्तीणीची गर्भावस्था 18 ते 22 महिन्यांपर्यंत असते.
  3. हत्तीच्या सोंडेत मुंगी घुसली तर त्याचा जीव तळमळतो. त्यामुळे हत्ती पाऊल टाकताना फूंकर मारत चालतो असं म्हणतात. 
  4. हत्तीचा सर्वाधिक वेळ हा खाण्यातच जातो. दिवसभरात त्यांना दिडशे किलोंहून अधिक खाद्य लागतं. 
  5. प्राण्यांमध्ये सर्वाधिक शक्तीशाली अशी हत्तीची ओळख आहे. हस्तीदंतांची मोठ्या प्रमाणावर तस्करीही केली जाते. 
  6. श्वानांप्रमाणेच हत्तींची वास घेण्याची क्षमता तीव्र असते. पाण्याचा वासही हत्ती बऱ्याच अंतरावरून ओळखतो. त्याची स्मरणशक्तीही जबरदस्त असते. 
  7. प्रत्येक सहकारी हत्तीसोबत घालवलेला वेळ त्याच्या लक्षात असतो. ते कधीच एकमेकांशी भांडत नाही. एखाद्या अपवादात्मक स्थितीतच हत्ती उधळतो. 
  8. एका हत्तीचं वजन दहा हजार किलो इतकं असू शकतं. हत्ती उभा राहूनच झोप घेतात आणि तीसुद्धा फक्त दिवसा चार तास. 
  9. हत्तीच्या शरीराचा सर्वात मऊ भाग असतो तो कानाच्या पाठिमागे. त्यामुळे कानाला धरूनच त्याला माहुत ताब्यात ठेवतात. 
  10. सध्या पृथ्वीवर हत्तीच्या  एलिफ्स (Elephas) आणि लॉक्सोडॉण्टा (Loxodonta) या दोनच प्रजाती उरल्या आहेत.  

भारतात राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाच्या स्थायी समितीने 13 ऑक्टोबर 2010 ला झालेल्या बैठकीत हत्तींना राष्ट्रीय वारसा घोषित कऱण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यानंतर पर्यावरण मंत्रालयाने याची अधिसूचना जारी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT