देश

आणीबाणीची घटनात्मक वैधता पडताळली जाणार;सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (indira Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस (Congress) सरकारने १९७५ साली लागू केलेल्या आणीबाणीला पूर्णपणे घटनाबाह्य घोषित केले जावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) सुनावणी होणार आहे. न्यायालयाने आज याबाबत केंद्र सरकारला मत मांडण्यास सांगितले आहे. एका ९४ वर्षीय महिलेने याबाबतची याचिका सादर करत २५ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 

न्या. संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज याचिकाकर्त्या महिलेस तिच्या याचिकेमध्ये काही सुधारणा करत शुक्रवारी पुन्हा नव्याने ही याचिका सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या खंडपीठामध्ये न्या. दिनेश माहेश्‍वरी आणि ह्रषीकेश रॉय यांचाही समावेश आहे. आता ४५ वर्षांच्या अवधीनंतर आणीबाणीची घटनात्मक वैधता तपासणे शक्य आहे का किंवा तसे करणे योग्य ठरेल काय याचीही पडताळणी केली जाणार असल्याचे खंडपीठाकडून सांगण्यात आले. 

जखमा उकरून काढण्यास नकार 
आणीबाणीचे सर्वच पैलू उघड करण्यास न्यायालयाने आज नकार दिला. यामध्ये एखाद्या व्यक्तीवर अन्याय झालेला असू शकतो त्यामुळे आता ४५ वर्षांनी या जखमा उकरून काढणे योग्य होणार नाही असेही न्यायालयाने नमूद केले पण या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेवर मात्र सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाने दर्शविली. 

ते घडायला नको होते 
याचिकाकर्त्याची बाजू मांडताना विधिज्ञ हरीश साळवे म्हणाले की, ‘‘ येथे सत्तेचा गैरवापर करून घटनात्मक गैरव्यवहार करण्यात आला आहे. नागरिकांचे हक्क जेव्हा गोठविले जातात तेव्हा हेच तत्त्व लागू होते. त्यामुळे या ऐतिहासिक घटनेची नव्याने पडताळणी होणे गरजेचे आहे.’’ यावर न्या. कौल यांनी १९७५ साली जे घडले ते घडायला नको होते असे मत मांडले. याचिकाकर्त्यां महिलेच्या पतीला आणीबाणीच्या काळात १९ महिन्यांसाठी ताब्यात घेण्यात आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

Latur Accident: चाकूरमध्ये भीषण अपघात; सिमेंट मिक्सरखाली येऊन नगरपंचायती कर्मचारी ठार

South Africa vs New Zealand: दक्षिण आफ्रिकन संघाची विजयी सलामी; न्यूझीलंडवर सात विकेट राखून मात; मोकोएना ठरला सामनावीर

Kolhapur Scam : गॅस कनेक्शन बंद होण्याच्या; नावाखाली फसवणुकीचा धोका पुणे, मुंबईत सायबर गुन्हेगार झाले सक्रिय

Latest Marathi Update : दुबईतील ड्रोन हल्ल्यांनतर एमिरेट्सचे विमान तिरुवनंतपुरमला माघारी परतले

SCROLL FOR NEXT