EPFO
EPFO  esakal
देश

EPFO च्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; नियमांमध्ये होणार बदल

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून (EPFO) खात्यातून 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. मेडिकल क्लेम (Medical Claim) अंतर्गत 1 लाख रूपये कर्मचाऱ्यांना काढता येणार असून यासाठीच्या नियमात लवकरच बदल (EPFO Amount Withdraw Process ) करण्यात येणार आहे. ईपीएफओने जारी केलेल्या निवेदनानुसार, आता ईपीएफओ सदस्य कोणतीही कागदपत्रे सादर न करता त्यांच्या पीएफ खात्यातून एक लाख रुपये काढू शकणार आहेत. (EPFO ​​Members Can Withdraw 1 lakh for Medical Purposes )

EPFO ही सुविधा पगारदारांना मेडिकल अॅडव्हान्स क्लेम अंतर्गत (EPFO Medical Advance Process ) देत आहे. जर खातेधारकांना वैद्यकीय कारणांसाठी तातडीने पैशांची गरज असेल, तर ते त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये काढू शकतात, असे ईपीएफओने म्हटले आहे. (How To Withdraw Advance From PF Account)

सेवानिवृत्तीवेळी ( Retirement ) कर्मचाऱ्यांना व्याजासकट (Interest Amount ) रक्कम दिली जाते. सोबत कर्मचाऱ्यांना पेंशन योजनेतदेखील गुंतवणूक करण्याचा पर्याय असतो.त्याशिवाय पीएफची (PF Amount) रक्कम काही कारणास्तव मुदतीआधी देखील काढता येते. मात्र, यासाठी मर्यादा घालण्यात आलेल्या असतात. दरम्यान, नियमांमध्ये करण्यात येणाऱ्या बदलामनुसार ईपीएफओ खातेधारक त्याच्या खात्यातून एक लाखांपर्यंतची रक्कम काढू शकणार आहे. मेडिकल क्लेम अंतर्गत ही एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम खाते धारकाला काढता येणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम घेताना खातेधारकाला कोणत्याही कागदपत्रांशिवाय ही रक्कम मिळू शकते. (Medical Documents For PF Amount)

EPFO मधून 1 लाख रुपये काढण्याच्या अटी

  • वैद्यकीय अडव्हान्सचा दावा करणारा रूग्णाला सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील युनिट/सीजीएचएस पॅनेल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे.

  • तातडीच्या स्थितीत खासगी रुग्णालयात दाखल केले असेल, तर यासंदर्भात चौकशी केली जाईल. त्यानंतरच, तुम्ही वैद्यकीय दाव्यासाठी अर्ज भरू शकता.

  • या सुविधेअंतर्गत तुम्ही फक्त 1 लाख रुपयांपर्यंतच अॅडव्हान्स काढू शकता. तुम्ही कामाच्या दिवशी अर्ज करत असाल तर दुसऱ्याच दिवशी तुमचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जातील.

  • हे पैसे कर्मचार्‍यांच्या खात्यात किंवा थेट हॉस्पिटलमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात.

EPFO मधून 1 लाख रुपये कसे काढायचे

  • सर्व प्रथम EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (www.epfindia.gov.in)

  • आता ‘ऑनलाइन सेवा’ पर्यायावर क्लिक करा

  • त्यानंतर तुम्हाला फॉर्म 31, 19, 10C आणि 10D भरावे लागतील

  • पडताळणी करण्यासाठी तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक एंटर करा

  • 'ऑनलाइन दाव्यासाठी पुढे जा' वर क्लिक करा

  • ड्रॉप-डाउन मेनूमधून फॉर्म 31 निवडा

  • आता पैसे काढण्याचे कारण आणि रक्कम प्रविष्ट करा

  • रुग्णालयाच्या बिलाची प्रत अपलोड करा

  • तुमचा पत्ता प्रविष्ट करा आणि 'सबमिट' वर क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT