nitish kumar sakal
देश

Nitish Kumar : बिहारमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार

‘बिहारमध्ये आगामी काही महिन्यांत पाच लाख सरकारी नोकऱ्या आणि सुमारे १२ लाखांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील’.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

पाटणा - ‘बिहारमध्ये आगामी काही महिन्यांत पाच लाख सरकारी नोकऱ्या आणि सुमारे १२ लाखांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील’ असे आश्‍वासन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारच्या वतीने देण्यात आले असून या दृष्टीने तातडीने काम करण्याचे आदेश नितीश यांनी सोमवारी सरकारला दिले आहेत.

त्याचप्रमाणे पेपरफुटीसारख्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यादृष्टीने राज्यसरकार कायदा बनविणार असून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तो कायदा सभागृहांत मांडण्यात येणार आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश सरकरावर रोजगारनिर्मितीमध्ये अपयशी ठरल्याची टीका केली असताना, बिहारमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नितीश सरकारकडून रोजगाराचा मुद्दा प्रचारात प्रभावीपणे मांडण्यात येणार असल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT