engineer ends life due the work from home stress at gujarat 
देश

वर्क फ्रॉम होमच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअरची आत्महत्या

वृत्तसंस्था

अहमदाबाद (गुजरात): वर्क फ्रॉम होमच्या त्रासाला कंटाळून एका इंजिनिअरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नुकताच त्याचा विवाह ठरला होता. विवाहापूर्वीच त्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली. मात्र, काम करताना योग्य सुविधा नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्क फ्रॉम होममुळे तणाव निर्माण होत असल्याची माहिती अहवालाद्वारे पुढे येत आहे. जिगर गांधी (वय 32) असे आत्महत्या केलेल्या इंजिनिअरचे नाव आहे. जिगर  नोएडा येथील एका कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून काम करत होता. लॉकडाऊनमुळे घरातून तो काम करत होता. वर्क फ्रॉम होमला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून त्याने आत्महत्या केली आहे. शवविच्छेदन अहलावात गळफास घेतल्याने जिगरचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. दुसरीकडे काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. मात्र, काम करताना योग्य सुविधा नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच वर्क फ्रॉम होममुळे तणाव निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना पानीपतमध्ये घडली होती. नोकरी गेल्याने एका दाम्पत्याने आत्महत्या केली होती. धक्कादायक बाब म्हणजे एका महिन्यापूर्वीच त्यांनी विवाह केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Summer Holiday : शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून

'चुकीच्या घरात जाता जाता वाचले' अभिनेत्री रुचिरा जाधव ब्रेकअपबद्दल म्हणाली...'विठ्ठलाकडे साकडं घातलं आणि दोन दिवसात सत्य...'

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज SIT चौकशी होणार?

Maharashtra Weather: राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा, मुंबईकर हैराण; उष्माघाताच्या घटनांतही वाढ

बाबो! मार्केटमध्ये खरंच 'प्रोटीन कंडोम' आलंय? नक्की हे आहे तरी काय? Flying Beast खरंच सीरियस की घेतोय मजा, Viral

SCROLL FOR NEXT