samir wankhede google
देश

समीर वानखेडेंवरील आरोपांची चौकशी सुरू, वानखेडे दिल्लीला जाणार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आर्यन खान ड्रग्स प्रकरणात (aryan khan drugs case) नवीन ट्विस्ट आला असून पंच प्रभाकर साईलने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB officer samir wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर एनसीबीचे डिडिजी अशोक जैन यांनी साईलचे अॅफिडेविट हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविले होते. त्यानंतर आता याप्रकरणी नुकतीच चौकशी सुरू झाली आहे, असे एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी माध्यमांना सांगितले.

''आमच्या दक्षिण-पश्चिम विभागातून आम्हाला एक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार नुकतीच चौकशी सुरू झाली आहे. मुख्य दक्षता अधिकारी ही चौकशी योग्य रितीने हाताळतील. पण, कोणत्याही अधिकाऱ्यावर अशी टिप्पणी करू नये'', असे ज्ञानेश्वर सिंह म्हणाले. त्यासाठी समीर वानखेडे यांना दिल्लीला बोलावण्याची शक्यता आहे. प्रभाकर साईलचे प्रतिज्ञापत्र महासंचालकांडे दिले असल्याने त्यात ज्यांची नावे आहेत त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

समीर वानखेडेंवर कोणते आरोप? -

आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची डील करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रभाकर साईलने केला आहे. तसेच या प्रकरणातील ८ कोटी रुपये हे समीर वानखेडे यांना जाणार होते. तसेच समीर वानखेडे यांच्याकडून जीवाला धोका असल्याचंही साईलने म्हटले आहे. त्यानंतर एनसीबीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT