Election Commission esakal
देश

Central Election Commission : सर्व पक्षांच्या उमेदवारांना समान वागणूक; केंद्रीय निवडणूक आयोगाचा दावा

यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज चार पानांचे निवेदन प्रसिद्धीला दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली ः सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांना कोणताही भेदभाव न करता समान वागणूक दिली जात आहे,’’ असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्याप्रकरणी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला टोला लगावला होता.

काँग्रेस नेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचीही तपासणी निवडणूक आयोगाने करावी असे काँग्रेसने म्हटले आहे. यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज चार पानांचे निवेदन प्रसिद्धीला दिले आहेत. यात सर्व राजकीय पक्षांना समान वागणूक दिली जात असल्याचा दावा केला आहे. ‘सर्व राजकीय पक्ष समान पातळीवर असले पाहिजे,’ हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे ध्येय असल्याचा दावा करून केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन योग्यरितीने होत असल्याचे म्हटले आहे. महिलांचा सन्मान महत्त्वाचा

या प्रचार काळात महिलांच्या आत्मसन्मान कायम राहिला पाहिजे, यासाठी निवडणूक आयोग दक्ष आहे. महिलांसंदर्भात अपमानकारक शब्द वापरणाऱ्यांवर आयोगाने कडक कारवाई केली आहे. यापुढेही ही कारवाई कायम राहील. यासाठी संबंधित व्यक्तीच नव्हे तर संबंधित राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनासुद्धा जबाबदार धरले जाईल, असा इशाराही केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

लग्नाला ११ वर्ष पूर्ण; तरीही पतीसोबत का नाही राहत अमृता खानविलकर? कारण सांगत म्हणाली, 'तो त्याच्या आईजवळ...'

Latest Marathi News Update : भारतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X क्रॅश

Thane News: कल्याण–शिळफाटा रस्त्यावरील मेट्रो कामाचे परिक्षण करा, मुलुंड दुर्घटनेनंतर प्रवाशांची मागणी

SCROLL FOR NEXT