narendra-modi. 
देश

लडाखमधील मातीचा छोटासा कणही भारताचा अभिन्न अंग- नरेंद्र मोदी 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनपेक्षितपणे लेहला भेट दिली. यावेळी मोदींनी जवानांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. जवानांची वीरता आणि त्यांच्या पराक्रमाचा प्रत्येक भारतीयाला गर्व आहे, असं ते म्हणाले आहेत. मोदींनी चीनलाही सज्जड दम दिला आहे. चीनने आपली विस्तारवादी भूमिका सोडावी, लडाखमधील मातीचा छोटासा कणही भारताना अभिन्न भाग आहे, असं म्हणत मोदींनी चीनसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

मोदींचा चीनला अप्रत्यक्ष इशारा; लष्कर प्रमुख अन् CDS अधिकाऱ्यांसह गाठले लेह
भारतमातेसाठी आपलं जीवन देणाऱ्या प्रत्येक सैनिकाला मी सलाम करतो. लडाखमधील प्रत्येक दगड, प्रत्येक नदी, प्रत्येक भाग आणि प्रत्येक मातीचा कण हा भारताचा अभिन्न अंग आहे. मी प्रत्येक जवानांचं अभिनंदन करतो. तुम्ही देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पर्वतासारखे रात्रंदिवस उभे आहात. तुमच्या सिंहनादाने भूमी आज जयकारा करत आहे. लडाख हे भारताचे मस्तक आहे. 130 करोड भारतीयांचा तो मान-सन्मान आहे. ही राष्ट्रभक्तांची भूमी आहे. आज लडाखचे लोक राष्ट्र मजबूत करण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असंही मोदी म्हणाले आहे.

भारत आणि चीनदरम्यान वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी लेहला दिलेली भेट महत्वपूर्ण आहे. पूर्व लडाखच्या गलवान भागात झालेल्या रक्तरंजित संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यामुळे उभय देशांमधील स्थिती स्फोटक बनली आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी लेहला भेट देत देशाची भूमिका स्पष्ट केली आहे. चीनने विस्तारवादी भूमिका सोडून द्यावी. विस्तारवाद हा नेहमीच मानवजातीसाठी विनाशाचा ठरला आहे, असं म्हणत मोदींनी चीनला इशारा दिला आहे.

गुडांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार, अधिकाऱ्यासह 8 जण हुतात्मा
भारताने गेल्या काही दिवसात चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारत सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी आणली आहे. तसेच चिनी कंपन्यांच्या भारतातील गुंतवणुकीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. त्यामुळे भारताने चीनविरोधात कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यातच मोदींनी आज संरक्षण प्रमुखांसमवेत लेहला भेट दिल्यामुळे चीनला भारताकडून थेट इशारा मिळाला आहे.

दरम्यान, 5 मे रोजी चीन सैनिकांनी गलवान खोऱ्यात घुसखोरी केली होती. त्यावेळी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. 15 जून रोजी तर दोन्ही देशांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यात दोन्ही देशांना जीवितहानी सोसावी लागली आहे. तेव्हापासून दोन्ही देशांनी सीमा भागात सैनिकांची जमवाजमव सुरु केली आहे. तसेच शस्त्रसाठाही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT