minister nirmala sitharaman - Narendra Modi
minister nirmala sitharaman - Narendra Modi 
देश

BJPला घरचा आहेर! भाजप नेत्यानेच म्हटलं निर्मला सीतारामण अर्थशास्त्रात निरक्षर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भाजप नेते आणि माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वामींनी निर्मला सीतारामन यांच्या ज्ञानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी खासदार स्वामी नेहमीच आपल्या ट्विटद्वारे मोदी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत असतात. (subramanian swamy news in Marathi)

शनिवारी एका ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी लिहिले की, 'त्या (अर्थमंत्री) अर्थशास्त्रात निरक्षर आहेत, त्या काहीही बोलू शकतात. भारतातील प्रसारमाध्यमे देखील भित्रे आहेत, त्यामुळे अर्थमंत्र्यांना ते धारदार प्रश्न विचारू शकत नाहीत, असं म्हणत स्वामी यांनी माध्यमांना देखील फटकारलं.

याआधीही सुब्रमण्यम स्वामी यांनी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर 2 सप्टेंबर रोजी टीका केली होती. अर्थमंत्री सीतारामण यांनी तेलंगणात सरकारी रेशन दुकानावर पंतप्रधान मोदींचा फोटो नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावरून स्वामी म्हणाले होते की, चमचगिरीलाही मर्यादा असतात. तुम्ही PDS च्या प्रभारी मंत्र्याला पत्र लिहून मोदींचा फोटो न लावल्याबद्दल तक्रार करू शकत होत्या.

दुसर्‍या ट्विटमध्ये माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी लिहिले, "मोदी सरकारच्या निरक्षर मंत्र्यांसह नवशिक्यांना हेही समजत नाही की पीपीपी पद्धतीचा वापर करून जीडीपीची योग्य गणना केल्यास, 2005 पासून भारताचा जीडीपी जगातील तिसरा सर्वात मोठा जीडीपी आहे. मात्र भारत दरडोई उत्पन्नात लोकसंख्येमुळे भारत मागे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT