hardik patel  sakal
देश

भाजप प्रवेशाआधी 'नवीन सुरुवात' म्हणत हार्दिक पटेलांनी राहत्या घरी केली पूजा

पक्ष प्रवेशाआधीच आगामी निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होणार असल्याचं पटेलांच भाकीत

सकाळ ऑनलाईन

काँग्रेसमधून बाहेर पडलेले पाटीदार नेता हार्दिक पटेल आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. गुजरातमधील कमलम गांधीनगरच्या भाजप कार्यालयात पक्ष प्रमुखांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश होणार आहे. पटेल यांच्या स्वागतासाठी सकाळपासूनच पक्ष कार्यालयाबाहेर पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेल यांनी ट्विट करत म्हंटल कि, आपण लहान सैनिक म्हणून काम करणार आहोत. दरम्यान, पक्ष प्रवेशाच्या आधी नवीन सुरुवात म्हणून हार्दिक यांनी आपल्या राहत्या घरी पूजा देखील केली आहे.

हार्दिक पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत म्हंटले की, राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनांनी मी आजपासून एका नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करेन.

या ट्विटनंतर हार्दिक पटेल यांनी आमदाबाद येथील आपल्या राहत्या घरी पूजा केली. माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पक्षप्रमुख जेपी नड्डा यांच्या उपस्थित हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून पाटीदार नेता हार्दिक पटेल यांची जोरदार चर्चा सुरु आहे. कित्येक महिन्यांपासून काँग्रेसच्या अंतर्गत कारभारावर नाराजी व्यक्त करत हार्दिक पटेल यांनी १८ मे रोजी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर दोन दिवसापूर्वीच हार्दिक पटेल यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हंटल होत.

ज्यानंतर आज पटेल अधिकृतरीत्या भाजप पक्षात प्रवेश करतील. प्रवेशाआधीच हार्दिक यांनी आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा एकतर्फी विजय होणार असल्याचं म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT