Arvind Kejriwal  
देश

Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाला केजरीवालांच्या अटकेची भीती; त्यामुळे...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : दिल्ली दारू धोरण प्रकरणी सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली. काही दिवसांपूर्वी सीबीआयने सीएम केजरीवाल यांना चौकशीत सहभागी होण्याची नोटीस दिली होती.

नोटीसनंतरच सीएम केजरीवाल रविवारी सीबीआय कार्यालयात पोहोचले. मात्र, सीबीआयने त्यांच्या चौकशीदरम्यान त्यांना कोणते प्रश्न विचारले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या सगळ्या दरम्यान आता सीबीआय या प्रकरणात केजरीवाल यांनाही अटक करू शकते, असे आम आदमी पक्षाला वाटत आहे.

आम आदमी पार्टीचे दिल्लीचे संयोजक गोपाल राय यांनी या भीतीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तातडीची बैठक बोलावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली आहे.

सीबीआयने केजरीवाल यांना आज 16 एप्रिल रोजी मुख्यालयात बोलावले होते. या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली होती. केजरीवाल सीबीआय मुख्यालयात पोहोचण्यापूर्वी तेथे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसंदर्भात दिल्ली पोलिसांनी सीबीआय मुख्यालयाभोवती कलम 144 लागू केले होते. या ठिकाणी आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार होती. यासोबतच आप मुख्यालय ते सीबीआय मुख्यालय या मार्गावर अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये धर्मांतरण आणि महिला शोषण प्रकरणात नवा वळण

SCROLL FOR NEXT