Jignesh Mevani
Jignesh Mevani 
देश

एक्झिट पोल 'नॉनसेन्स': जिग्नेश मेवानी

वृत्तसंस्था

अहमदाबाद - गुजरात विधानसभेसाठी वर्तविण्यात आलेल्या एक्झिट पोलचे अंदाज मूर्खपणाचे (नॉनसेन्स) असून, भाजपचा याठिकाणी नक्की पराभव होईल, असे मत दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी व्यक्त केला आहे.

गुजरात विधानसभेसाठी सोमवारी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीपूर्वी सर्व वाहिन्यांनी आपले अंदाज भाजपच्या बाजूने दिले आहेत. सर्वेक्षणामध्ये भाजपच पुन्हा याठिकाणी सत्ता स्थापन करणार असे सांगण्यात आले आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना जिग्नेश मेवानीने हे अंदाज मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे. जिग्नेश वडगाव मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.

जिग्नेश मेवानी म्हणाला, की मला नक्की विश्वास आहे की भाजपचा याठिकाणी पराभव होणार. ते गुजरातमध्ये सरकार स्थापन करू शकत नाहीत. जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकूर या तिन्ही युवा नेत्यांनी भाजपला पाठिंबा न देता काँग्रेसला साथ दिली होती. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची बनली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT