Watermelon sakal
देश

Watermelon : अय्यो! चक्क साडे चार लाखांचं एक कलिंगड; खावं की तिजोरीत ठेवावं?

आज आपण सोन्याहून महाग असणाऱ्या या खास साडे चार लाखांच्या कलिंगडाविषयी जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Watermelon : सध्या उन्हाळा सुरू झालाय. त्यामुळे सगळीकडे कलिंगड विक्रीला आले आहेत. आपल्यापैकी अनेकजण दररोज कलिंगड विकत घेत असावे किंवा कलिंगडचा ज्युस पित असावे कारण कलिंगड हे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

शरीराला हायड्रेट ठेवते. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून कलिंगड खावे, असा सल्ला दिला जातो. (Expensive Densuke Watermelon cost four and half lakhs photo goes viral )

साधारणत: कलिंगड हे शंभर दोनशे किलोच्या भावाने आपण विकत घेतो पण तुम्ही कधी साडे चार लाखांचं कलिंगड कधी बघितलं का? तुम्ही म्हणाल, साडे चार लाखांचं कलिंगड कसं शक्य आहे आणि एवढ्या महागड्या कलिंगडमध्ये नेमकं असतं तरी काय? असे प्रश्न पडणे, साहजिक आहे पण हे खरंय. आज आपण सोन्याहून महाग असणाऱ्या या खास साडे चार लाखांच्या कलिंगडाविषयी जाणून घेणार आहोत.

Expensive Densuke Watermelon

कलिंगडाची किंमत साडे चार लाख रूपये म्हटलं तर कुणालाही धक्का बसेल. मुळात एवढं महाग कलिंगडमध्ये काय असतं? आणि हे कलिंगड कुठे मिळतं, हे प्रश्न पडणारचं. मुळात हे कलिंगड साधारण कलिंगड नाही. या कलिंगडला डेनसूक वॉटरमेलन म्हणतात. हे दिसायला बाहेरुन काळे असतात त्यामुळे याला ब्लॅक वॉटरमेलनही म्हटले जाते.

हे कलिंगड खूप दुर्मिळ आहे. साहजिकच किंमत एवढी असताना याची खरेदी करणारेही खूप कमी असतात. वर्षातून शंभरच्या जवळपास या कलिंगडाचं उत्पादन केलं जातं. या कलिंगडाची चवही बाकी कलिंगडापेक्षा वेगळी आणि हटके अन् टेस्टी असते.

विशेष म्हणजे हे कलिंगड भारतातील नसून जपानी आहे. जपानच्या होकाइडो आयलंड भागात या कलिंगडाचं उत्पादन केलं जातं. जपान अनेक देशांना या कलिंगडाची निर्यात करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT