Expert advice in Jaipur Literature Festival Dont use social media blindly
Expert advice in Jaipur Literature Festival Dont use social media blindly 
देश

Jaipur Lit Fest 2020 : आंधळेपणाने सोशल मीडिया वापरू नका : तज्ज्ञांचा सल्ला

सम्राट फडणीस

जयपूर : आंधळेपणाने सोशल मीडिया वापरू नका, असा सल्ला देश-विदेशातील तज्ज्ञ आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युअर्सनी तेराव्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये आज समारोपाच्या सत्रात दिला. 

सोशल मीडिया फुकट आहे, असा भ्रम आहे. तुमचा डेटा वापरून सोशल मीडिया कंपन्या नफा कमावतात, असे गणितज्ज्ञ आणि ब्रिटीश लेखक मार्कस् ड्यू सोटॉय यांनी सांगितले. 'सोशल मीडिया अल्गॉरिदमचा अतिशय भयानक वापर करतो आहे,' असा इशारा त्यांनी दिला. 'सोशल मीडियामुळे चर्चेचा सूर निश्चित होतो, असे नाही. आपण वस्तुस्थितीचा आग्रह धरला पाहिजे,' असा सल्ला त्यांनी दिला. 

विमान दुर्घटना : ८३ प्रवाशांसह विमान कोसळलं 

सोशल मीडियामुळे वास्तवाच्या आकलानावर गंभीर परिणाम होत आहे, अशी भीती ब्रिटीश लेखक जॉन लँचेस्टर यांनी व्यक्त केली. 'फेसबूकचे न्यूज फीड भावनिक गोष्टींना प्राधान्य देते. कारण, माणूस भावनिक गोष्टींकडे झुकतो. तुम्ही जास्तीत जास्त वेळ राहावे, अशी अल्गॉरिदमची रचना आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. 

पंतप्रधानांचं हास्य घायाळ करणारं; महिला मंत्री पंतप्रधानांवर फिदा

सोशल मीडियावर भाषेची शालिनता हवी; मात्र ती टॉप टू बॉटम यायला हवी. ज्या देशात पंतप्रधान 'कपड्यांवरून माणसे ओळखतो', 'पचास करोड की गर्लफ्रेंड' अशी द्वेष पसरवणारी विधाने करतात, तेथे सोशल मीडियावर दुहीचाच सूर लागतो, असे सांगताना द वायर या संकेतस्थळाचे संपादक सिद्धार्थ वरदराजन म्हणाले, 'हा दोष सोशल मीडियाचा नाही. समाजात संवादासाठी नव्हे तर फाळणीसाठी वापरणारे सोशल मीडिया वापरणाऱ्यांचाच आहे.'

कसा आहे सोशल मीडिया? तज्ञ सांगतात...

  • समाजाचे प्रतिबिंब दाखवणारा. सामान्यांची शक्ती वाढवणारा. - राणा आयुब, पत्रकार-लेखिका
  • मतप्रदर्शनाची गरज निर्माण करणारा; थेट डोक्यात द्वेष भरवणारा - फे डिसुझा, टीव्ही पत्रकार
  • व्यसनी बनवणारा; निनावी मुशाफिरीची संधी देणारा
    - मकरंद परांजपे, लेखक-प्राध्यापक
  • आपल्या समाजाचे खरे रूप दाखविणारा
    - मिहीर शर्मा, अभ्यासक
  • तुमचा वेळ काढून घेणारा; फुट पाडणारा- नीलांजना रॉय, पत्रकार-लेखिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT