Nitin Gadkari Announcement about Expressway Toll System

 

esakal

देश

Expressway Toll System : आता ‘एक्स्प्रेसवे’वर टोल भरण्यासाठी गाडी थांबवून वाट पाहण्याची गरज नसणार!

Nitin Gadkari Announcement about Expressway Toll System : केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी संसदेत सांगितलं नेमकं कसं?

Mayur Ratnaparkhe

New Expressway Toll Collection System : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत माहिती दिली की, २०२६ च्या अखेरीस देशभरात मल्टी-लेन सीमलेस ट्रान्सपोर्ट (एमएलएफएफ) टोल प्रणाली आणि एआय-संचालित महामार्ग व्यवस्थापन पूर्ण केले जाईल आणि एकदा अंमलात आणल्यानंतर, या तंत्रज्ञानामुळे टोल प्लाझावरील वाहनचालकांचा थांबण्याचा वेळ फार कमी होईल.

गडकरी म्हणाले की, नवीन तंत्रज्ञान एआय-आधारित असेल. त्यामुळे,  वाहनचालकांना आता टोल प्लाझावर वाट पाहावी लागणार नाही आणि यामुळे जवळपास दीड हजार कोटी रुपयांची इंधन बचत होईल. शिवाय, सरकारी महसुलात सहा हजार कोटी रुपयांची वाढ देखील होईल. 

याबाबत नितीन गडकरींनी सांगितले की,  "मल्टी-लेन सीमलेस ट्रान्सपोर्ट टोल (MLFF) ही एक खूप चांगली सुविधा आहे. पूर्वी आम्हाला टोल भरावे लागत होते आणि त्यासाठी तीन ते १० मिनिटे लागायची.  नंतर, FASTag मुळे हा वेळ ६० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी झाला आहे आणि आमचे उत्पन्न किमान पाच हजार कोटींनी वाढले आहे. आता FASTag ऐवजी MLFF लागू झाल्यामुळे,  कार आता जास्तीत जास्त ८० किलोमीटर प्रति तास वेगाने टोल नाका पार करू शकतील आणि कोणालाही टोलवर थांबवले जाणार नाही."

याशिवाय गडकरीं सांगितले की, "आमचा प्रयत्न हा शून्य मिनिटांवर आणण्याचा आहे आणि यामध्ये AIसह सॅटेलाइटच्या माध्यमातून नंबर प्लेट ओळख  आणि FASTag  समाविष्ट असेल.’’ तसेच त्यांनी सांगितले की, "२०२६ पर्यंत आम्ही हे काम १०० टक्के पूर्ण करू. हे काम पूर्ण झाल्यावर, १५०० कोटी रुपयांची बचत होईल, आमचे उत्पन्न आणखी सहा हजार कोटी रुपयांनी वाढेल आणि टोल चुकवेगिरी दूर होईल. कोणतीही समस्या राहणार नाही व लोकांना टोल प्लाझावर थांबावे देखील लागणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Law: नामांकन वादांना पूर्णविराम? निवडणूक कायद्यात बदलांना मंजुरी; महापालिका निवडणुकीआधी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

Gen-Z Post Office: मुंबईत पहिले जेन-झी पोस्ट ऑफिस! विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार, काय आहेत सुविधा?

Railway Luggage Rules : विमानासारखेच नियम रेल्वेमध्येही लागू होणार! , ‘फर्स्ट एसी’मध्ये ७० किलो पर्यंतच सामान मोफत नेता येणार

Latest Marathi News Live Update : अधिकारी-कर्मचारी महासंघाचा उद्यापासून ‘कामबंद’चा इशारा

Pune Crime : अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई; साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त; पाच जणांना अटक!

SCROLL FOR NEXT