S Jayshankar Sakal
देश

G20 Summit: बाली आणि दिल्लीत तुलना होऊ शकत नाही; जाहीरनाम्यातील 'युक्रेन' मुद्द्यावर जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जी-२० शिखर परिषदेतील बाली जाहीरनामा आणि नवी दिल्ली जाहीरनामा याच्यामध्ये तुलना होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. बाली जाहीरनामा जेव्हा स्कीकारण्यात आला तेव्हा परिस्थिती वेगळी होती, असं ते म्हणाले आहेत.

तुलगा करताना मी एवढेच म्हणेन की बाली बाली आहे आणि नवी दिल्ली नवी दिल्ली आहे, असं जयशंकर म्हणाले. ( External affairs minister S Jaishankar dismissed any comparison between the Bali declaration the New Delhi declaration)

मागील वर्षी इंडोनेशियाच्या बाली येथे जी-२० शिखर परिषद पार पडली होती, पण युक्रेनबाबत सहमती होऊ शकली नव्हती. यावर भाष्य करताना जयशंकर म्हणाले की, 'बाली परिषदेला आता एक वर्ष झाला आहे. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. वर्षभरामध्ये पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं आहे.'

रशिया-युक्रेन मध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जाहीरनाम्यावर एकमत घडवून आणणे कठीण होते. पण, भारताने हे कठीण काम करुन दाखवलं. जाहीरनाम्यात रशियाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. केवळ युक्रेनचा प्रश्न मांडण्यात आला होता. बाली जाहीरनाम्यादरम्यान अशी ऐकी पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे युक्रेनच्या मुद्द्यावरुन जी-२० गटामध्ये गट पडले होते.

भू-राजकीय मुद्द्याबाबत जाहीरनाम्यामध्ये एकूण आठ पॅरेग्राफ होते, त्यातील सात पॅरेग्राफ पूर्णपणे युक्रेन विषयावर भर देणारे होते. यातील अनेक मुद्दे राजनैतिक दृष्या खूप महत्त्वाचे होते. त्यामुळे याविषयी आपण वेगला दृष्टीकोन ठेवू शकत नव्हतो, असं जयशंकर म्हणाले.

बाली जाहीरनाम्यामध्ये जसं तेव्हाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रतिसाद देण्यात आला होता, तसंच दिल्ली जाहीरनाम्यामध्ये सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन प्रतिसाद देण्यात आला आहे. चीनने जी-२० परिषदेतील अनेक मुद्द्यांवर खूप सहकार्य केलं, असंही जयशंकर म्हणाले आहेत.

जी-२० शिखर परिषदेत दिल्ली जाहीरनाम्यावर सर्व राष्ट्रांची सहमती मिळवून भारताने मोठे यश मिळवल्याचं बोललं जातं. युक्रेन मुद्द्यावरुन हा जाहीरनामा नाकारला जाण्याची किंवा सर्व नेत्यांचे एकमत न होण्याची शक्यता होती. पण, भारताची मुत्सद्देगिरी कामाला आहे. त्यामुळे सर्वानुमते हा जाहीरनामा मंजूर करण्यात आला.

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु असताना हा प्रश्न चर्चेतून सोडवला जावा अशी भूमिका भारत सरकारने घेतली आहे. भारताच्या या भूमिकेचा स्वीकार करत सर्व जी-२० नेत्यांनी दिल्ली जाहीरनामा मंजूर केला.युक्रेनने या जाहीरनाम्यावर समाधानी नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fire: जंगली महाराज रोडवर भीषण आग! पेट्रोल पंपामागील गॅरेज जळून खाक, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल

Stock Market : आज शेअर बाजारात या PSU शेअरचा जलवा! गुंतवणूकदार मालामाल; जाणून घ्या पुढे काय?

Kolhapur Fraud Case : तीन वर्षांपासून पसार असलेला ग्रोबझ फसवणुकीतील आरोपी अखेर जेरबंद; २६ हजार गुंतवणूकदारांच्या पैशांचा तपास वेगात

स्टार प्रवाहाने पाच स्लॉट गमावले; टीआरपीमध्ये झी मराठीची चलती; 'तारिणी', 'कमळी'नंतर आणखी एका मालिकेचा जलवा

ठाकरे गट, काँग्रेस आणि भाजप आमनेसामने! मतदार कुणाकडे झुकणार? वाचा BMC निवडणुकीत अंधेरी पश्चिमचे समीकरण

SCROLL FOR NEXT