Eye Flue  esakal
देश

Eye Flue : भारतात पसरतोय आय फ्लू, तुमची एक चूक पडेल महागात; डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा

आय फ्लूचं संक्रमण नेमकं कशामुळे होतंय तसेच यावर उपाय काय? याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Eye Flue : देशात आय फ्लूची प्रकरणं झपाट्याने वाढताय. बऱ्याच कुटुंबांमध्ये हे संक्रमण एकापाठोपाठ एकाला होताना दिसतंय. हे संक्रमण नेमकं कशामुळे होतंय तसेच यावर उपाय काय? याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

आय फ्लूची कारणे सविस्तर जाणून घेण्यासाठी hindustan.com ने ऑप्थेलमोलॉजिस्टर रिंकी शर्माशी संपर्क साधला असता त्यांनी या संसर्गाशी संबंधित महत्वाचं कारण सांगितलं. "इतर ऋतूच्या तुलनेत पावसाळ्यात आय फ्लूचा धोका जास्त असतो. याचं मुख्य कारण म्हणजे हवामानात असलेला ओलावा. हवेतील ओलाव्यामुळे बॅक्टेरिया, व्हायरस सहज रिप्लीकेट होतात.

यंदा जुलैमध्ये आय फ्लूची बरीच प्रकरणं पुढे आलीत. जुलै महिन्यात या संसर्गाने त्रस्त सर्वाधिक रूग्णांची नोंद केली गेली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा रूग्णांचा आकडा मोठा आहे.

आय फ्लूपासून असा बचाव करा

आय फ्लू पासून बचाव करण्यासाठी हायजीन मेंटेन करा. तुमचा आंघोळीचा टॉवेल आणि कपडे कोणाशी शेअर करू नका.ज्यांना हा संसर्ग झालाय त्यांना शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला पाठवू नका. सुट्टी घ्यायला सांगा. (Health)

आय फ्लू झाल्यास अशी घ्या काळजी

आय फ्लू झाल्यास दिवसातून दोन वेळा डोळे धुवा. आय स्पेशालिस्टने सुचवलेला ड्रॉप वेळोवेळी डोळ्यात टाका. मेडिकल स्टोअरमधून तुमच्या मताने औषधी घेऊ नका. कारण बहुतांश स्टोअर्समध्ये स्टेरॉइड्सयुक्त औषधी विकल्या जातात. यामुळे डोळ्यांच्या समस्या वाढून त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. (Eye Care)

आय फ्लू किती दिवसांत ठिक होतो

ही एक व्हायरल कंजक्टिव्हिटी आहे. हा संसर्ग आपोआप बरा होतो. तुमच्या टॉवेल, कपड्यांतून हा संसर्ग संपूर्ण कुटुंबाला होऊ शकतो. आय फ्लू बरा होण्यास ३-५ दिवस लागतात. शिवाय हे संक्रमण एका डोळ्याला झाले असल्यास दुसऱ्या डोळ्यालाही होऊ शकतं. अशा परिस्थितीत तुम्हाला बरे होण्यास जास्त काळही लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

SCROLL FOR NEXT