Corona vaccine Google file photo
देश

केंद्र सरकारची फॅक्ट चेक पोस्ट फेसबुकने उडवली, आता म्हणे 'चुकून झालं'

सूरज यादव

नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांच्यात नव्या नियमांवरून सुरु असलेला वाद आणखी वाढण्याची शक्यता आङे. गेल्या महिन्यात फेसबुक आणि इन्स्टाग्रामने पीआयबीच्या फॅक्ट चेक पोस्ट डिलिट केल्या होत्या. कोरोनाबाबतच्या या पोस्ट चुकीच्या असल्याचं कारण त्यांनी सांगितलं होतं. मात्र आता या पोस्ट पुन्हा एकदा सोशल मीडियावर पुर्ववत करण्यात आल्या आहेत.

पीआयबी फॅक्ट चेकने 25 मे रोजी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. त्यामध्ये फ्रान्सच्या नोबेल विजेत्यांनी केलेला कोरोना लसीकरणाबाबतचा दावा फेटाळण्यात आला होता. कोरोनाची लस घेणाऱ्यांचा दोन वर्षात मृत्यू होईल असा दावा त्यांनी केला होता. पोस्टमध्ये संबंधित दाव्याचा स्क्रीनशॉट टाकण्यात आला होता. पोस्टला कॅप्शन देताना म्हटलं होतं की, फ्रान्सच्या नोबेल विजेत्या ल्यूक मोंटेनियर यांच्या दाव्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. त्यात दावा केला जात आहे की, कोरोनाची लस घेणाऱ्यांचा दोन वर्षांनी मृत्यू होईल. फोटोमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे. कोरोनाची लस पुर्णपणे सुरक्षित आहे. व्हायरल मेसेज चुकीचा असून त्याकडे लक्ष देऊ नका'

फॅक्ट चेकच्या या पोस्टला फेसबुक आणि इन्स्टाग्रामने दुसऱ्याच दिवशी कोणतंही स्पष्टीकरण न देता हटवलं होतं. आता फेसबुकने या प्रकऱणी पीआयबी पेजला फेक न्यूज पसरवू नये असा इशाराही दिला होता. या प्रकरणी पीआयबीच्या अधिकाऱ्यांनी आयटी मंत्रालयाशी संपर्क केल्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्रामच्या अधिकाऱ्यांना मेल पाठवण्यात आला. त्यानंतर दोन्ही प्लॅटफॉर्मवर पोस्ट पुन्हा पुर्ववत दिसू लागली. याबाबत फेसबुक प्रवक्तयांनी माहिती दिली आहे. चुकून ही पोस्ट काही वेळासाठी ब्लॉक झाली होती असं त्यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udhayanidhi Stalin Arrest : मुख्यमंत्र्यांवर टीका करताना अभिनेत्रीबाबत वादग्रस्त विधान भोवले; माजी उपमुख्यमंत्र्यांना अटक, नेमकं काय घडलं?

भारतात लाँच होणार Vivo S2! मिड-बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स! 7050mAh बॅटरीसह 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग! किंमत फक्त...

Koyna Dam: मोठी बातमी! कोयना धरणात २४ तासांत ३.६१ टीएमसी पाण्याची भर; महाबळेश्वर, कोयनानगर, नवजामध्ये पावसाची मुसळधार

Marathi Live Updates News: भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी भीक मागून निधी संकलन

Gas Cylinder Accident: क्षणात होत्याचे नव्हते! गॅस सिलेंडर बसविताना भीषण आग; एका महिलेसह चार जण भाजले

SCROLL FOR NEXT