facebook Sakal
देश

Facebook : नोकरीसाठी सातासमुद्रातून कॅनडात पोहचला अन् 2 दिवसातंच Facebookने काढलं

सकाळ डिजिटल टीम

ट्वीटर आणि फेसबुक या कंपन्यांतून कामगारांना नोकऱ्यावरून काढण्याचा कार्यक्रम सध्या इलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांनी सुरू केला आहे. याचा फटका अनेक भारतीय नागरिकांना झाला असून त्यांना नोकरीला मुकावे लागले आहे. ट्वीटरनंतर फेसबुकने आपल्या ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी जॉईन झालेल्या एका भारतीयालाही आपली नोकरी गमवावी लागली आहे.

हेही वाचा : कर्ज परतफेडीच्या नियोजनाचे पाच मार्ग...

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कंपनीत जॉईन झालेल्या व्यक्तीचे नाव हिमांशू व्ही असं असून त्याला दोनच दिवसांत आपली नोकरी गमवावी लागली आहे. दोन दिवसांपूर्वी तो कंपनीत जॉईन होण्यासाठी कॅनडात गेला होता. पण तिथे गेल्यावर त्याला कळालं की आपल्याला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे.

यानंतर त्याने आपल्या लिंक्डइन अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्यांनी यामध्ये आपली नोकरी गमावली आहे त्यांच्यासाठी हा खडतर प्रवास आहे असंही हिमांशू याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. तर त्याने कॅनडामध्ये असलेल्या इतर सॉफ्टवेअर कंपन्यांबाबत माहिती देण्याची मदत लोकांकडून मागितली आहे. त्याचबरोबर यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावली आहे त्यांना हार न मानण्याचा आणि हिंमत न हारण्याचा सल्ला त्याने दिलाय.

मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यावर गदा आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT