Facebook e sakal
देश

‘नियम मान्य’, केंद्राच्या डेडलाइनवर फेसबुकची प्रतिक्रिया

सूरज यादव

केंद्र सरकार 26 मेपासून नवीन नियम लागू करणार आहे. त्याचं पालन केलं नाही तर सोशल मीडिया कंपन्यांवर कारवाई होऊ शकते.

नवी दिल्ली - देशातील (India) सोशल मीडिया कंपन्यांना सरकारने नियमांचे पालन करण्यासाठी शेवटची मुदत दिली आहे. एक दिवस बाकी असताना फेसबुकने (Facebook) यावर प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने म्हटलं की, आम्ही सरकारच्या (India Govenrment) नियमांचे पालन करू, सध्या काही मदुद्यांवर चर्चा सुरु आहे. आमच्ये ध्येय आयटीच्या निमयाचे पालन करणे हे आहे आणि सध्या अशा काही मुद्द्यावर चर्चा सुरु आहे ज्यावर सरकारसोबत बोलण्याची गरज आहे. (facebook says we comply with the provisions of the IT rules)

फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, आयटीच्या नियमांनुसार आम्ही नियम लागू करण्यासाठी आणि सुधारणांसाठी काम करत आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर लोकांना स्वतत्रं आणि सुरक्षितपणे व्यक्त करता यावं यासाठी फेसबुक कटिबद्ध आहे.

केंद्र सरकार 26 मेपासून नवीन नियम लागू करणार आहे. त्याचं पालन केलं नाही तर सोशल मीडिया कंपन्यांवर कारवाई होऊ शकते. केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये कंपन्यांना आदेश दिले होते. यासाठी तीन महिन्याची मुदतही देण्यात आली होती. 26 मे रोजी ही मुदत संपणार आहे. दरम्यान, सोशल मीडिया कंपन्यांकडून सरकारच्या नियमांचे पालन अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे दोन दिवसात केंद्राकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने 25 फेब्रुवारीला भारताच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून डिजिटल कंटेटंवर नजर ठेवण्यासाठी तीन महिन्यांच्या आत कम्प्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र भारतापुरते मर्यादीत राहणार आहे. मात्र कंपन्यांनी केंद्राच्या या आदेशाकडे कानाडोळा केला आहे. फेसबुकने यावर मौन सोडलं असलं तरी ट्विटरकडून यावर कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT