देश

Fact Check : मोदींच्या कार्यालयात खरंच अंबानी दाम्पत्यांचा फोटो आहे का? 

सकाळवृत्तसेवा

भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावरुन  मोदी सरकारला नेहमीच लक्ष करण्यात येतं. यातच आता मोदींच्या कार्यालात अंबानी कुटुंबीयांचा एक फोटो असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सचिन तेंडुलकरसोबत आपल्या कार्यालयात बसलेले आहेत. आणि भिंतीवर एक फोटो लावलेला आहे, ज्यामध्ये मुकेश अंबानी आणि निता अंबानी असल्याचं दिसत आहे. याच फोटोला पोस्ट करत काही नेटकऱ्यांनी मोदींना लक्ष केलं आहे.  मोदी यांनी कार्यालयात आपल्या मालकाचा फोटो लावल्याची टीका एका नेटकऱ्यानं केली आहे. खरचं मोदी यांनी कार्यालयात अंबानी दाम्पत्यांचा फोटो लावलेला आहे का? या व्हायरल होणाऱ्या फोटोमागील सत्य आपण पाहूयात...

इंडिया टुडेनं या फोटोबाबत गुगलवर आधीक सर्च केलं असता व्हायरल होणारा फोटो फेक असल्याचं समोर आलं आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोसोबत छेडछाड केल्याचं सिद्ध झालं आहे. खऱ्या फोटोंमध्ये भिंतीवर अंबानी दाम्पत्यांचा फोटो नाही, दुसरा फोटो आहे. मोदी आणि सचिनच्या फोटोला मॉर्ब करण्यात आलं आहे. भिंतीवरील फोटोंमध्ये अंबानी दाम्पत्याचा फोटो एडिट करण्यात आला आहे. 

एका नेटकऱ्यानं मॉर्ब केलेला फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. युजर्सनं फोटो पोस्ट करत लिहिलेय की, 'हे पाहा, मालकाचा फोटो आपल्या कार्यालयात लावला आहे. अंधभक्तांनो तुम्हाला आणखी काय पुरवा हवा आहे.' विशेष म्हणजे या फोटोखाली काही नेटकऱ्यांनी त्या युजर्सला फोटो खोटा असल्याचं सांगत कमेंटमध्ये सुनावलं आहे. 

सत्य कसं समजलं? 
व्हायरल होणाऱ्या फोटोला रिव्हर्स केल्यानंतर सत्य बाहेर आलं. छेडछाड न केलेला फोटो अनेक प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये दिसून आला.  खऱ्या फोटोंमध्ये भिंतीवर ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो लावण्यात आलेला स्पष्ट दिसत आहे.  २०१७ मध्ये  "Sachin: A Billion Dreams" या आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सचिन तेंडुलकरनं मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी हा फोटो घेण्यात आला होता.  यावेळी अंजली तेंडुलकरही उपस्थित होती.  त्यावेळी सचिन तेंडुलकर आणि मोदी यांनी ट्विट केलं होतं.

व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील अंबानी दाम्पत्यांचा फोटो कुठून घेतल्याचेही समोर आलं आहे.  अंबानी दाम्पत्यांचा हा फोटो "Your Portrait" नावाच्या  फेसबुक पेजवर उपलब्ध आहे. तेथूनच हा फोटो घेऊन मोदी आणि सचिनच्या फोटोवर मर्ज करण्यात आला आहे.  

वरील सर्व बाबींवरुन व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये कोणतेही सत्य नसल्याचं स्पष्ट होतेय. हा फोटो एका एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीनं तयार करण्यात आला आहे. या आधीही अंबानी कुटुंबीय आणि मोदी यांच्यावरुन अनेक अफवा पसरल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT