family dance in covid ward after testing negative at mp video viral 
देश

कोविड सेंटरमध्ये कुटुंबाने केलेला डान्स व्हायरल...

वृत्तसंस्था

कतनी (मध्य प्रदेश): कोरोना व्हायरसचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर एका कुटुंबातील आठ सदस्यांनी कोविड सेंटरमध्ये डान्स केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका कुटुंबातील 19 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आठ ऑगस्ट रोजी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली. अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे कुटुंबातील सदस्य आनंदात होते. घरी जाण्यापूर्वी त्यांनी कोविड सेंटरमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंगच्या छिछोरे या चित्रपटातील 'चिंता करके क्या पायेगा, मरने से पहले मर जायेगा...' या गाण्यावर डान्स केला.

कोविड सेंटरमध्ये केलेल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डान्स करणाऱयांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. डान्स करत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांना मानसिक आधार मिळण्यासाठी आम्ही नृत्य केला आहे, असे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT