Agniveer Yojana sakal
देश

Agniveer Compensation: "अग्निवीरांच्या कुटुंबियांना 1 कोटींहून अधिक नुकसान भरपाई देणार"; राहुल गांधींनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारची घोषणा

Agniveer Compensation Marathi News :यापूर्वी यासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दाव्याचं खंडन करताना संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सोमवारी जाहीर केलं की, लष्करी सेवेत असताना मृत्यू झालेल्या अग्निवीराच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाईल.

"सक्रिय लष्करी सेवेदरम्यान कोणत्याही अग्निवीरचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. यामध्ये 48 लाख रुपयांच्या विम्याचा समावेश आहे ज्यासाठी अग्निवीरकडून कोणतेही पेमेंट घेतले जात नाही. 44 लाख रुपये अनुग्रह सेवा सुमारे 11.70 लाख रुपयांचं निधी पॅकेज आणि सेवा कालावधीसाठी शिल्लक असलेले वेतन याशिवाय, अग्निवीरांसाठी 50 लाख ते 1 कोटी रुपयांचे विमा संरक्षण देखील आहे. ज्यासाठी सरकारने विविध बँकांशी करार केला असून विम्यासाठी अग्निवीरांना कोणताही प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही,” असं सूत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या अग्निवीरांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईबाबत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी लोकसभेत जोरदार तोफा डागल्यानंतर काही तासांनंतर संरक्षण खात्यानं हे स्पष्टीकरण दिलं आहे.

लोकसभेत अग्निवीर योजनेवर बोलताना राहुल गांधींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर हल्लाबोल केला आणि दावा केला की, कर्तव्यावर असताना प्राण गमावलेल्या अग्निवीरांच्या कुटुंबाला देण्यात आलेल्या 1 कोटी रुपयांच्या भरपाईबद्दल त्यांनी खोटी माहिती दिली आहे.

"अग्नवीरच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची भरपाई देण्यात आल्याचं संरक्षणमंत्र्यांनी याआधी सांगितले होतं, पण ते चुकीचे होतं. विम्याची रक्कम अग्निवीरच्या कुटुंबाला देण्यात आली. त्यांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये अग्निवीरांच्या पेन्शनचा समावेश न केल्याबद्दलही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली.

"मोदी सरकारनं लष्कराच्या जवानांना अग्निवीर चक्रव्यूहात अडकवले आहे. अग्निवीरांच्या पेन्शनसाठी बजेटमध्ये एक रुपयाही नाही. तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणता. पण जेव्हा अग्निवीरांना मदत करण्याचा आणि सैनिकांना पैसे देण्याचा प्रश्न येतो तेव्हा तुमच्या बजेटमध्ये एक रुपयाही दिसत नाही," असं राहुल गांधी म्हणाले होते.

दरम्यान, राहुल गांधी यांनी सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्पावरून भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आणि देशात भीतीचं वातावरण असल्याचं सांगितलं आणि देश आता कमळाच्या चक्रव्यूहात अडकला आहे, असा आरोप केला. तसंच देशातील शेतकरी, कामगार आणि तरुण घाबरलेले आहेत, असंही यावेळी राहुल गांधी मोदी सरकारवर टीका करताना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT