farm123
farm123 
देश

8 डिसेंबरच्या 'भारत बंद'ला देशव्यापी स्वरुप; काँग्रेससह डझनभर पक्षांचे समर्थन

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- तीन कृषी कायद्यांविरोधात  (Farm Law) शेतकऱ्यांनी सुरु केलेले आंदोलन (Farmer's Protest) देशव्यापी आंदोलनाचे स्वरुप घेत आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. यात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानसह अनेक राज्यातील संघटना भाग घेणार आहेत. अनेक राजकीय पक्षांनीही या भारत बंदला समर्थन दिले आहे. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसनेही या बंदला पाठिंबा दिला आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेडा म्हणाले की, "काँग्रेसने 8 डिसेंबरला होणाऱ्या भारत बंदला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पक्ष कार्यालयासमोरही आंदोलन करणार आहोत. राहुल गांधींचा पाठिंबा शेतकरी आंदोलनाला मजबूतीने देण्यासाठी हे पाऊल असेल. प्रदर्शन यशस्वी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करु."

कोरोनाच्या भीतीने पतीने टाळले शारीरिक संबंध; नववधुने ठोकला नपुंसक असल्याचा दावा

'ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटी'च्या बॅनरखाली बोलावण्यात आलेल्या भारत बंदमध्ये देशातील 400 पेक्षा अधिक शेतकरी संघटना भाग घेत आहेत. काँग्रेससह अन्य काही राजकीय पक्षांनीही याला पाठिंबा दिला आहे. तृणमूल कांग्रेस, राष्ट्रीय लोक दल, राजद, राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसपा) आणि सपा या पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. डावेपक्ष सीपीआई, सीपीआईएम, सीपीआई (एमएल), RSP आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षांचाही आंदोलनाला पाठिंबा आहे.

शनिवारी चार तासांहून अधिक वेळ चाललेल्या शेतकरी आणि सरकारच्या बैठकीमध्ये तोमर यांनी तीनही कृषी कायद्यांमध्ये अनेकदा सुधारणा करण्याची तयारी दाखवली होती. शेतकऱ्यांना ज्या आणि जशा सुधारणा हव्या असतील त्या करण्यास सरकार तयार आहे. अगदी पूर्णविराम, अनुस्वार, स्वल्पविराम यासह कोणतीही दुरुस्ती शेतकऱ्यांनी सांगितली तरी सरकार ती करेल असे तोमर यांनी वारंवार स्पष्ट केले. मात्र शेतकरी नेत्यांनी तिन्ही कायदे रद्द करा असा आग्रह कायम ठेवला. 

भारतात सीरमपूर्वी Pfizer India ची लस येणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असतील तर त्यासाठी आम्हाला मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करावी लागेल, असे सांगून तोमर यांनी नऊ तारखेच्या बैठकीचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, तिन्ही कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना हव्या असलेल्या दुरुस्त्या करण्यासाठी संसदेचे तीन ते चार दिवसांचे विशेष अधिवेशन नजीकच्या काळात बोलावले जाऊ शकते असे संकेत देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT