farmer leaders
farmer leaders  
देश

शेतकरी सरकारसोबत चर्चा करण्यास तयार, तारीखही ठरली!

सकाळ ऑनलाईन टीम

Farmer Leaders Decide  To Talks With Govt :  कृषी कायद्याच्या विरोधात सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसलेल्या शेतकऱ्यांनी सरकारसोबत पुन्हा एकदा चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. शनिवारी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची खास बैठक झाली. या बैठकीत सरकारसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 29 डिसेंबरला 11 वाजता शेतकरी नेते सरकारसोबत चर्चा करणार असून यासंदर्भातील प्रस्ताव देखील सरकारला पाठवण्यात आला आहे. 

गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चा करावी. ज्या काही शंका आहेत त्याचे निरासन केले जाईल, अशी भूमिका सरकारने घेतली होती. मात्र नवा कृषी कायदा मागे घेतल्याशिवाय चर्चा होणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावत शेतकरी आपल्या मताव ठाम होते. पण आता त्यांनी चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. संयुक्त किसान मोर्चाची शनिवारी बैठक झाली. यावेळी सरकारसोबतच्या चर्चेसह अनेक मुद्यावर विचार करण्यात आल्याचे समजते.  

look Back 2020: यावर्षी कोणत्या जीवनावश्यक वस्तूं झाल्या महाग, कोणत्या स्वस्त?
 
शनिवारी पंजाबसह अन्य भागातील शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी मोर्चा बांधणी केल्याचेही पाहायला मिळाले होते. ट्रॅक्टर ट्रॉली, कार आणि अन्य वाहनातून वयोवृद्धांसह महिला शेतकरी राजधानीच्या दिशेने पावले टाकत आहेत.  अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय राज्य मार्गावर हे चित्र दिसत असल्यामुळे आंदोलन आणखी काही काळ राहणार असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यामुळे चर्चेतून काही मार्ग निघणार की आंदोलन सुरु राहणार यासंदर्भात आताच काही सांगणे देखील कठीण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : केजरीवालांच्या निवासस्थानातून पोलिसांनी CCTV DVR केलं जप्त; पुरावे गोळा करुन टीम रवाना

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

Janhvi Kapoor : "लहान असताना अश्लील साईटवर माझे फोटो..."; जान्हवीने शेअर केला बालपणीचा 'तो' वाईट अनुभव

Rohit Sharma : खासगी संभाषण उघड करणाऱ्या आयपीएल ब्रॉडकास्टरवर रोहितनं काढला जाळ

SRH vs PBKS Live Score : पंजाबची दमदार सुरूवात; तायडे अन् प्रभसिमरनची 96 धावांची सलामी

SCROLL FOR NEXT